AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election Results 2026 LIVE : बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता

PCMC Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्यात मोठ्या प्रतिक्षेनंतर महापालिकेच्या निवडणुका झाल्या. राज्य निवडणुक आयोगाने 29 महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली.

PCMC Election Results 2026 LIVE : बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता
Pimpri Chinchwad Municipal Corporation
| Updated on: Jan 16, 2026 | 7:23 AM
Share

मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले की, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पडत आहे. अनेक वर्षांपासून राज्यातील 29 महापालिकांवर प्रशासकीय राज होते. शेवटी निवडणुकांचे कार्यक्रम जाहिर करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात मोठ्या प्रमाणात समीकरणे बदलल्याचे बघायला मिळाले. जे पक्ष युती म्हणून निवडणुका लढायचे ते आता एकमेकांच्या विरोधात लढले. एका महापालिकेत युती तर दुसऱ्या महापालिकेत विरोधात निवडणुका लढवल्या गेल्या. राज्यात एनसीपी शरद पवार गट आणि अजित पवार गट वेगळे असून एकमेकांच्या विरोधात आहेत तर तेच महापालिकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र येत निवडणुका लढवताना दिसले.

राज्यातील महत्वाच्या आणि मोठ्या महापालिकेपैकी एक पिंपरी चिंचवड महापालिका आहे. कायमच अजित पवारांचे या पालिकेवर वर्चस्व बघायला मिळाले. मात्र, 2017 च्या निवडणुकीत मोठा धक्का देत पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि सर्वच राजकीय समीकरणे बदलल्याचे बघायला मिळाले. अनेक दिग्गजांना धक्के बसले. आताही अजित पवारांनी महापालिकेच्या सत्तेवर दावा केला.

चारच्या प्रभागानुसार पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका लढवल्या जातात. एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून येतात. प्रभाग क्रमांक 12 च्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, महादेव गोपाळ शिवरकर रस्ता, साने चौक चिखली, देहू-आळंदी रस्ता, सावतामाळी रस्ता, छत्रपती शिवाजी संभाजी मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, व्हिनस हॉस्पिटल जाधव सरकार चौकापर्यंत, स्पाईन रस्ता इर्थपर्यंत प्रभाग 12 आहे. प्रभाग 12मध्ये एकूण लोकसंख्या 34,418 इतकी आहे.

वॉर्ड क्रमांत 13 ची लोकसंख्या 39 हजार 149 आहे. मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, तळवडे चिखली शिवेवरील रस्त्यावरील हॉटेल तुळजाईपासून पूर्वीस श्रीमती हौसाबाई नारायण मोरे स्कूल लगतच्या रस्त्याने अष्टविनायक चौक ओलांडून गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत. चिखली आकुर्डी रस्त्याने दक्षिणेस साने चौकापर्यंत. आहे. गेल्या निवडणुकीत दोन भाजप, एक राष्ट्रवादी, एक मनसे असे चार उमेदवार विजयी झाले होते.

14 लोकसंख्या 35 हजार 711 आहे. अनुसूचित जातीची 5 हजार 713 तर अनुसूचित जमातीची 589 आहे. हा अत्यंत मोठा प्रभाग आहे. तळवडे रोड, प्रबोधन बोधनी इंग्रजी मीडियम शाळेपर्यंत. तळवडे चिखली शिवेपासून दक्षिणेस धनगर बाबा मंदिराच्या रस्त्याने त्रिवेणीनगर रस्ता ओलांडून व शिवरकर चौक ओलांडून कुदळवाडी इंडस्ट्रीयल रस्त्याच्या आनंदघन वृद्धाश्रापर्यंत व त्याच रस्त्याने पूर्वेस ओम साई चौक, चिखली आकुर्डी रस्त्यापर्यंत प्रभाग आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...