नाथाभाऊंच्या जावयाने ड्रग्स घेतले काय? वकिलाचा दावा काय? म्हणाले, जाणूनबुजून…
पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आणि एकच राजकीय भूकंप आला. पोलिसांवर थेट आरोप एकनाथ खडसे यांनी केली आहेत.

पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमधून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांनी पोलिसांनी अटक केली. आता एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले. प्रांजल यांच्या वकिलांनी मोठा दावा केलाय. प्रांजल खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, प्रांजल खेवलकरांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले नाही. पोलिस जाणीवपूर्वक फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट न्यायालयाला सादर करण्यास विलंब करीत आहेत.
प्रांजल खेवलकरांच्या वकिलाच्या गंभीर आरोप
फॉरेन्सिकलॅबचे रिपोर्ट न्यायालयात सादर केल्यास प्रांजल खेवलकरांची न्यायालय त्वरित सुटका करू शकते. यामुळेच पोलीस जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा दावा प्रांजल केवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी केला. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस कशाप्रकारे काम करत आहेत आणि आपल्या जावयावर अगोदरपासूनच पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा त्यांनी आरोप केला.
फॉरेन्सिकलॅबचे रिपोर्टला उशीर करण्याचे कारणच टाकले सांगून
आज या प्रकरणात कोर्टात सुनावणी आहे. मात्र, फॉरेन्सिकलॅबचा रिपोर्ट अजून आला नाहीये, कोर्ट यावर काय सुनावणी करते, याकडे राज्याच्या नजरा आहेत. काल रात्री उशीरा रोहिणी खडसे यांनी पुणे पोलिस आयुक्तांनी भेट घेतली. यादरम्यान काय चर्चा झाली हे कळू शकले नाहीये. हेच नाही तर या रेव्ह पार्टी प्रकरणात आपण पोलिसांना नोटीस पाठवणार असल्याचेही खडसे यांनी म्हटले.
प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमधील फोटो आणि व्हिडीओ पोलिसांनीच केली व्हायरल
जावई प्रांजल यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आणि मोबाईलमधील खासगी फोटो त्यांनी व्हायरल केली. मुळात म्हणजे त्यांन हा अधिकार कोणी दिला? खासगी आयुष्यातील फोटो व्हायरल जावयाच्या मोबाईलमधून व्हायरल झाल्याने खडसेंनी संताप व्यक्त केला. पोलिस आयुक्तांकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसेंचा जावई असल्याची कल्पना आपल्याला अगोदर नव्हती आणि तपासामध्ये ही बाब पुढे आली. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे दोघेही पुण्यात आहेत.
