मोठी बातमी! काल ठाकरे बंधूंचा मेळावा अन् आज शिवसेनेच्या बड्या नेत्याचं थेट शिंदेंना पत्र, घडामोडींना वेग
सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही आदेश रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यानंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यानं एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे.

सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही आदेश रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती. यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हटलं सरनाईक यांनी?
कालच्या विजयी मेळाव्यानंतर प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन पानाचं पत्र लिहिलं आहे. यामध्ये ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कालच्या मेळाव्यात स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा दिसला, असं या पत्रात म्हटलं आहे.
प्रताप सरनाईक यांनी तीन पानी पत्र लिहिलं आहे, यामध्ये कशापद्धतीनं मराठी माणसाला टोपी घालण्यात आली, आणि हे सगळं ठाकरे बंधू कशापद्धतीनं पाहात होते? या सर्वांचा उल्लेख आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यचा डाव आहे, असा अपप्रचार काहीजण वर्षांनुवर्ष करत आहोत, आणि मराठी माणसांची मत लाटली जात आहेत. मुंबईचा नाही पण प्रत्यक्षात स्वत:चाच विकास शिवसेना ठाकरे गटानं केला आहे, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच वेगळी करू शकणार नाही, ती हिंमत कोणातच नाही, हेही यांना चांगलंच माहीत आहे, परंतु तरी देखील हे सांगितलं जात आहे, असंही या पत्रात सरनाईक यांनी म्हटलं आहे.
शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात वीस वर्षांनंतर प्रथमच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले. मात्र त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.