राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं?; अजित पवार यांनी उडवली खिल्ली

राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. ते बारामतीत होते. अजित पवार यांनी यावेळी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली.

राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं?; अजित पवार यांनी उडवली खिल्ली
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 2:20 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी अजितदादांच्या केलेल्या मिमिक्रीची चर्चा होत असतानाच अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री करण्याशिवाय दुसरं येतंच काय? असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीची खिल्ली उडवली. पुण्यात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी राज यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे. मागे त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते. दुसऱ्या टर्मला एक आमदार आला. आमचे जुन्नरचे सहकारी शरद सोनावणेंनी तिकीट घेतलं म्हणून तेवढी पाटी लागली. आता कल्याणचे आमचे सहकारी निवडून आले. त्यांच्याबरोबर जे होते, काही लोकं सोडली तर सर्व लोकं दूर गेली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी, त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवार यांचं व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

काही अडचण?

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्याची घोषणा करण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला अजित पवार नव्हते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते पत्रकारांवरच भडकले.

ये… त्याच्याबद्दल पवार साहेबांनीच सांगितलं. पुन्हा पुन्हा काय रे ते… तिथं भुजबळ साहेब होते का?… होते? काय बोलतोय… अरे वेड्या 25 जणं आम्ही त्या कमिटीत होतो. पवार साहेबांना आम्ही भेटायला गेल्यानंतर पवार साहेब म्हणाले, त्यांचे कलिग म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेला हजर राहावं. प्रांत अध्यक्ष म्हणून जयंतरावांनी उपस्थित राहावं. केरळचे प्रतिनिधी म्हणून आमदार आले होते. त्यांनी उपस्थित राहावं. नॉर्थमधील नेते होते. पीसी चाको निघून गेले. अशा ठरावीक लोकांनी उपस्थित राहण्याचं ठरलं. पत्रकार परिषदेत चारपाच खुर्च्या असतात. त्यामुळे साहेब म्हणाले, बाकी येऊ नका. साहेबांचा आदेश शिरसावंद्य. काही अडचण?, असा सवाल अजितदादांनी केला.

मला काय करायचं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकात प्रचारासाठी गेले आहेत. त्याबाबत अजितदादांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री कुठे गेले मला काय करायचं? मुख्यमंत्री कुठे गेले मी त्यांच्या वॉचवर नाही. तुम्ही माझ्या वॉचवर आहात तसं मी नाही. मला माझी कामे आहेत. मी ते करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.