‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे’, कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी, या पवारांची लागणार वर्णी?

Baramati Vidhan Sabha : लोकसभेचा निकाल येताच बारामतीमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अजित पवार यांनी काकांविरुद्ध गेल्यावर्षी जुलै महिन्यात बंड केले होते. आता काही नागरिकांनी बारामती विधानसभेचा आमदार बदलण्याची मागणी केल्याने चुरस वाढणार हे नक्की

'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी, या पवारांची लागणार वर्णी?
Ajit Pawar Sharad Pawar
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 10:28 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागील शुक्लकाष्ठ कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. एकामागून एक धक्क्यांची मालिका सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकच खासदार निवडून आला. तर मोदी कॅबिनेटमध्ये पण त्यांना स्थान मिळाले नाही. त्यांची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात येणार होती. या ऑफरला पवार गटाने नकार दिला. विधानसभेची मोर्चे बांधणी सुरु करण्यापूर्वीच बारामतीमधील काही नागरिकांना आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे. बारामतीतून नवीन चेहरा देण्याचे साकडे काही जणांनी शरद पवार यांना घातले आहे.

युगेंद्र पवार यांचे नाव केले पुढे

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहेत. शरद पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गोविंद बागेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या पवारांसमोर सध्याच्या राजकीय नेत्याविषयी खंत व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

दादा शब्द फिरवणार नाहीत

बारामतीत मध्ये विधानसभेला पवार विरुध्द पवार होणार नाही कारण अजित पवारांनी शब्द दिला होता की जर लोकसभेला सुनेत्रा पवार पडल्या तर मी विधानसभा लढणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. युगेंद्र पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्या या मागणीसाठी बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत आले होते.

युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीची चर्चा

शरद पवार तीन दिवस बारामतीत

शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ते मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करतील. त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच गोविंद बागेत नागरिकांनी गर्दी केली आहे.

गेल्या विधानसभेत अजितदादांचा मोठा विजय

बारामती विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी राष्ट्रवादीत उभी फुट पडली नव्हती. त्यावेळी अजित पवार यांना 1,95,641 मते पडली होती. तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 30,376 मते पडली होती. अजितदादांनी पडळकर यांचा 1,65,265 मतांनी पराभव केला होता.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.