AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचं ठरलं! पुणे महापालिकेची निवडणूक मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार; कसा असेल निवडणुकीचा प्लान?

पुणे महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पुणे महापालिकेची निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

भाजपचं ठरलं! पुणे महापालिकेची निवडणूक मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार; कसा असेल निवडणुकीचा प्लान?
भाजपचं ठरलं! पुणे महापालिकेची निवडणूक मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार; कसा असेल निवडणुकीचा प्लान? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 8:05 AM
Share

पुणे: पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation) जिंकण्यासाठी भाजपने  कंबर कसली आहे. पुणे महापालिकेची निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली आहे. पुणे महापालिकेसाठी प्रचारप्रमुख म्हणून राजेश पांडे यांची घोषणा केल्यानंतर भाजपकडून (BJP ) ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मुळीक यांनी या पूर्वीच पुणे महापालिकेत 100 पेक्षा जास्त जागा जिंकून आणणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मुळीक आता पुणे महापालिका जिंकण्यासाठी काय रणनीती आखतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच भाजप रिपाइंला सोबत घेऊनच या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजप रिपाइंला किती जागा सोडणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपची निवडणुकीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रचार प्रमुखाची निवड घोषित केल्यानंतर आमदार जगदीश मुळीक यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार असल्याचं आज भाजपने स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपने निवडणुकीचा प्लानही आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बूथ स्तरापर्यंतच्या रचना पूर्ण करण्यात आल्या आहेत. तर शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणूक व्यवस्थापन समितीची रचना लवकरच पूर्ण होणार असल्याची चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.

मुळीक काय म्हणाले?

यापूर्वी मुळीक यांनी पुणे महापालिकेसाठी मिशन 100चा नारा दिला होता. पुणे महापालिकेत 100 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचं मुळीक यांनी म्हटलं होतं. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखड्यावर मुळीक यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राज्यातील महविकास आघाडी सरकारबद्दल जनतेत रोष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत मुळीक

जगदीश मुळीक हे भाजपचे माजी आमदार आहेत. मुळीक 2014 मध्ये वडगावशेरी मतदारसंघात विजयी झाले होते.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164

संबंधित बातम्या:

‘शरद पवारांना 2024 ला सर्वात मोठी भेट द्यायची आहे’, मावळमध्ये जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश; ती भेट नेमकी कोणती?

राजकारण्यांकडून अपेक्षा नाहीत, साहित्यिकांनी मराठी भाषेची गोडी वाढवावी : राज ठाकरे

Mhada | पुणेकरांना मोठा दिलासा ! म्हाडा’च्या ‘एवढ्या’ नवीन सदनिका व व्यापारी संकुलासाठी लॉटरी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.