का म्हणाले अजित पवार, आम्ही काही साधू संत नाही, राजकारणी आहोत? पालिका निवडणुकीवर मोठं भाष्य

तुम्ही सगळे मला अनेक वर्षांपासून ओळखता. त्यासंदर्भामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन ताब्यामध्ये असेल तर त्या संदर्भामध्ये समन्वय साधता येतो.

का म्हणाले अजित पवार, आम्ही काही साधू संत नाही, राजकारणी आहोत? पालिका निवडणुकीवर मोठं भाष्य
उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी-चिंचवड : आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनंही जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी अजित पवार यांनी आज महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन ताब्यामध्ये असल्यास त्या संदर्भात समन्वय साधता येतो, असं सूचक वक्तव्य करत अजितदादांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. (Deputy chief minister Ajit Pawar big statement on pimpari chinchwad corporation election)

‘राजकीय जीवनात काम करताना अशा प्रकारच्या घटना घडतच असतात. पाठिमागच्या काळामध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, भाजप सत्ताधारी होती. त्यावेळेस काही लोकांना असं वाटत होतं आपण भाजपमध्ये जावं, म्हणजे मग आपण रुलिंग पार्टीमध्ये राहू. मग आपल्या वॉर्डमध्ये कामं करता येतील. तशा पद्धतीने आता आम्ही काही करतो. तुम्ही सगळे मला अनेक वर्षांपासून ओळखता. त्यासंदर्भामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन ताब्यामध्ये असेल तर त्या संदर्भामध्ये समन्वय साधता येतो. त्यामुळे माझी इच्छा आहे की सर्वांना माहित आहे की गेली 25 वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही कशा प्रकारचं काम केलं. आणि काम करत असताना नेहमी विकासाचं व्हिजन ठेवूनच आम्ही काम करत आहोत’, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

पुण्यात भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात?

अजित पवार म्हणाले की, विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही अनेक वर्ष पिंपर-चिंचवडमध्ये कामं केली. मात्र 2013-14 मध्ये नरेंद्र मोदींची देशभरात हवा होती. त्यामुळे चांगलं काम करुनही आम्हाला विरोधात बसावं लागलं. परंतु आता भाजपमधील अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांना सांगतो, की ज्यांना यायचं आहे त्यांनी डिस्क्वालिफाय (अपात्र) झालं नाही पाहिजे. ते निवडणुकीसाठी अपात्र ठरले तर पुढील 6 वर्ष ते निवडणूक लढू शकणार नाहीत. आत्ता जे आले आहेत ते अपक्ष आहेत, किंवा असे काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत, किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत.

अनंत चतुर्दशीला पुणे बंद

गणेशोत्सव काळात पुण्यात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नव्हती. मात्र, अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) म्हणजे गणपती विसर्जनादिवशी (Ganesh Visarjan) पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार आणि पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. (Deputy chief minister Ajit Pawar big statement on pimpari chinchwad corporation election)

इतर बातम्या

होय..! लातुरच्या डोंगराळ भागात काजूची बाग, अर्ध्या एकरात लाखोंचे उत्पन्न

VIDEO: कुत्रा आणि कबुतराची जोडी जमली, दोघांची मैत्री पाहून सर्वच चकीत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI