अजित पवारांना पुन्हा धक्का, मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी; चौकशी कशासाठी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच अजितदादांना आणखी एक धक्का बसला आहे. (ed raids on jagdish kadam home at pune)

अजित पवारांना पुन्हा धक्का, मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी; चौकशी कशासाठी?
ed office pune
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 11:05 AM

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच अजितदादांना आणखी एक धक्का बसला आहे. अजितदादांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले आहेत.

दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आयकर विभागाची धाड

दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.

दौंड कारखान्याचा खुलासा

दरम्यान, दौंड साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यात कोणतीही अनियमितता नसल्याचा खुलासा केला होता.

या कारखान्यांवर छापेमारी

दरम्यान, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने या आधीही कारवाई केली. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला होता. आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी तेव्हा व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या:

केपी गोसावी पोलीस आयुक्तालयात, 3 वाजता कोर्टात हजर करणार; जामीन होणार?

होय, माझ्याही कंपन्यांवर आयकरने धाडी टाकल्या : अजित पवार

लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी; जयंत पाटलांचा दावा

(ed raids on jagdish kadam home at pune)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.