AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse : बोपोडी जमीन प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेत काय केला दावा?

Pune Land Scam : पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणात एका पाठोपाठ एक खुलासे समोर येत आहे. पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी या प्रकरणी गोत्यात आली आहे. तर पार्थ पवार वगळता इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मोठा खुलासा केला आहे.

Eknath Khadse : बोपोडी जमीन प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेत काय केला दावा?
एकनाथ खडसे
| Updated on: Nov 08, 2025 | 12:37 PM
Share

Eknath Khadse on Bopodi Land Scam : पुणे येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहे. या मालिकेत आता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पण खुलासे केले आहेत. पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र नसतानाही बोपोडी येथे हा जमीन अपहार करण्यात आला. 5 एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही जमीन 1883 पासून कृषी खात्याकडे होती. शासनाच्या ताब्यात असताना आणि वहिवाट असतानाही हा जमीन घोटाळा करण्याची मजल लँड माफियांनी मारली.त्याबाबत आता खडसेंनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले खडसे?

बोपोडी येथील हा तुकडा 5 लाख 75 हजार चौरस फुटांच्या जवळपास आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. ही जमीन लाटण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. ही जमीन नावावर करून घेतली, अशा प्रकारचा हा गुन्हा आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, ही पेशव्यांची जमीन होती. विध्वंस आणि भट या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिली होती. कुटुंबात मुलगा होईपर्यंत ही जमीन या कुटुंबाकडे असेल आणि मुलगी झाली तर ही जमीन काढून घेण्यात येईल अशी अट होती. मुलगा असेपर्यंत हा अधिकार या कुटुंबाकडे राहिला, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

पुढे ही जमीन सरकार दरबारी जमा झाली. 1883 सालापासून ही सरकारी जमीन आहे. 1920 मध्ये ही जमीन कृषी विद्यापीठासाठी देण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ही जमीन कृषी खात्याकडे आहे. ही जमीन मोकळी आहे. ही जमीन हार्ट ऑफ दि सिटी आहे. साखर भवन, कृषी विद्यालयासह इतर इमारती येथे आहे. शिवाजीनगर परिसरात ही जमीन आहे. 1500 कोटी रुपयांची ही जमीन आहे. मधल्या काळात विध्वंस कुटुंबाला हाताशी धरून हेमंत गावंडे, शीतल तेजवानी यालोकांनी मुख्यत्यारपत्र तयार करून की आम्ही कुळ आहोत अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले असा आरोप खडसेंनी केला.

फडणवीस आणि खडसेंनी उठवला होता आवाज

2009 पासून ही लोक त्यासाठी पाठपुरावा करत होती. दरम्यानच्या काळात पुण्याचा डीपी प्लॅन आला. त्यानंतर ही जमीन पीएमटीला आरक्षीत दाखवण्यात आली. ती जमीन पडून राहिली. ही जमीन आपली असल्याचे अपील सरकारकडे केले. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळले. मंत्र्यांनी हा दावा फेटाळला. हायकोर्टाने याप्रकरणात चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले. सरकारने पुन्हा जमीन त्यांचा असल्याचा दावा नाकारला. या जमिनीवर टीडीआर मिळावा यासाठी पुणे महानगरपालिकेकडे अर्ज केला. ही फाईल मंजुरीपर्यंत आली. मी विरोधी पक्षनेता असताना 2014 मध्ये रवींद्र भऱ्हाटे या कार्यकर्त्यांना हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. सर्व्हे क्रमांक 62, बोपोडीमध्ये बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन लाटण्याचा प्रकार होत असल्याचे मी पत्राद्वारे सरकारच्या लक्षात आणून दिले. हा टीडीआर मंजूर न करण्याची आग्रही मागणी देवेंद्र फडणवीस आणि मी विधानसभेत केली. पुढे मंत्री झाल्यावर मी कृषी खात्याचे त्या जमिनीवर हक्क संरक्षित केले अशी माहिती खडसे यांनी दिली.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.