सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, पती पत्नीत कडाक्याचं भांडण, पतीकडून पत्नीचा निर्घृण खून, कर्जत हादरलं

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पती पत्नीच्या भांडणात महिलेचा खून झाला आहे. या घटनेने कर्जत तालुका तसंच मिरजगाव परिसर हादरला आहे.

सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, पती पत्नीत कडाक्याचं भांडण, पतीकडून पत्नीचा निर्घृण खून, कर्जत हादरलं
Crime-News
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 9:51 AM

कर्जत (अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पती पत्नीच्या भांडणात महिलेचा खून झाला आहे. या घटनेने कर्जत तालुका तसंच मिरजगाव परिसर हादरला आहे. महिला दिनीदिवशी महिलेचा खून झाल्याने तालुक्यातील महिलांच्यामध्ये संतापाची लाट आहे. (Husband and wife quarrel, murder Wife Mirajgaon karjat)

प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा लग्नानंतर अवघ्या सहा महिने झालेले असताना पत्नीचा निर्घृण खून केला आणि आत्महत्या केल्याचा बनाव केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघडकीस आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली.

नेमकी घटना काय?

दि. 8 मार्च रोजी मिरजगाव येथील शंकर किशोर साळवे आणि पत्नी नेहा यांच्यात दुपारी कडाक्याचे भांडण झाले. यात किशोर याने नेहाला लाथाबुक्क्याने तसंच कमरेच्या पट्टयाने मारहाण करून भिंतीवर डोके आपटले होते. यावेळी त्या ठिकाणी नेहा यांची बहीण दिक्षा आणि लहान भाऊ तेथे हजर होते. बहीण दिक्षा हिने त्यांना समजावून सांगितले परंतु त्यांचे भांडण मिटत नसल्याने दिक्षा आणि लहान भाऊ हे आपल्या गावी निघाले होते.

भाऊ-बहीण वाटेत असताना किशोर साळवे याने त्यांना फोन करून सांगितले की, नेहा हिने गळफास घेऊन आत्महत्या घेतला. मी सध्या तिला घेऊन मिरजगावमधल्या दवाखान्यात घेऊन… आलोय तुम्हीही या… असे सांगितल्याने दिक्षा आणि लहान भाऊ मिरजगाव येथे आले. तोपर्यंत नेहाचा मृत्यू झाला होता.

पोलिसांत खूनाचा गुन्हा

कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिरजगाव दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन होऊन अहवालात वैद्यकीय प्रमाणपत्रात डोक्यास अंतर्गत मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने मयताची बहीण दिक्षा ठोसर रा.नवसरी गुजरात यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपी शंकर साळवे यास ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे करीत आहेत.

(Husband and wife quarrel, murder Wife Mirajgaon karjat)

हे ही वाचा :

अंबरनाथमध्ये चहाच्या उधारीवरुन तलवारीचे वार, एक जण जखमी, दोघांना बेड्या

भयानक ! नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या पोटात प्रायव्हेट पार्टद्वारे हवा भरली, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.