Sambhaji Chhatrapati: संभाजी छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडमधून, राज्यसभेसाठी ‘या’ आमदाराने दिलं समर्थन; इतर पक्षांची भूमिका काय?

Sambhaji Chhatrapati: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांना उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा जाहीर केला.

Sambhaji Chhatrapati: संभाजी छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडमधून, राज्यसभेसाठी 'या' आमदाराने दिलं समर्थन; इतर पक्षांची भूमिका काय?
संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: tv9 marathi
प्रदीप कापसे

| Edited By: भीमराव गवळी

May 16, 2022 | 1:34 PM

पुणे: संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांचा राज्यसभेचा कार्यकाळ (Rajya Sabha Election) संपल्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात न जाता स्वराज्य या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. मात्र, अजून कोणत्याही राजकीय पक्षाने संभाजी छत्रपती यांना राज्यसभेसाठी पाठिंबा जाहीर केलेला नाही. परंतु, रायगडमधून संभाजी छत्रपती यांनी पहिला पाठिंबा मिळाला आहे. संभाजी छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी (mahesh baldi) यांची पहिली सही केली आहे. बालदी यांनी संभाजी छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच राज्यातील राज्यसभा उमेदवारांचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांना उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्रातून पहिला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज संभाजी छत्रपती यांनी उरण येथे बालदी यांच्या निवासस्थानी येऊन पाठिंबा जाहीर केल्याबद्दल आभार मानले. यावेळी आमदार बालदी यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून पहिली स्वाक्षरीही केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांनीही बालदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच राज्य समन्वयक अंकुश कदम व धनंजय जाधव यांनी महाराष्ट्रातील सर्व अपक्ष आमदारांना संभाजी छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

काय आहे गणित?

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेल्या सहा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, भाजपचे पियुष गोयल, डॉ विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे, काँग्रेसचे पी. चिदंबरम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. तर संभाजी छत्रपती यांचाही राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. आधीच्या संख्याबळानुसार 3 जागा भाजप, 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला 2 जागा, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेसाठी संभाजी छत्रपती यांनी दावा केला आहे. त्यामुळे ही जागा सत्ताधारी विरोधक संभाजी छत्रपतींना सोडतात की या जागेवर उमेदवार देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

तर वावगे ठरू नये

संभाजी छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना करतानाच आपली भूमिकाही स्पष्ट केलं. उद्या स्वराज्य संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर झालं तरी वावगे समजू नये. या संघटनेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. राज्यभर दौरा केल्यानंतर सर्व समाजबांधवांना काय वाटते, त्यांची भावना जाणून घेऊन पुढील वाटचाल करणार आहे. दरम्यान, पक्षाचे चिन्ह आणि रंग अद्याप ठरवला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें