पूजा चव्हाणप्रकरणी आवाज उठवणाऱ्या संघटना तिच्या कुटुंबाला का भेटल्या नाही?; नीलम गोऱ्हे यांचा सवाल

नीलम गोऱ्हे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली. (neelam gorhe reaction on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाणप्रकरणी आवाज उठवणाऱ्या संघटना तिच्या कुटुंबाला का भेटल्या नाही?; नीलम गोऱ्हे यांचा सवाल

पुणे: पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांना आम्ही भेटू शकत नाही. भेटलो तर आम्ही दबाव आणतो की काय असे वाटेल. पण पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवणाऱ्या सामाजिक संघटना पूजाच्या कुटुंबीयांना जाऊन का भेटल्या नाही, असा सवाल शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. (neelam gorhe reaction on Pooja Chavan Suicide Case)

नीलम गोऱ्हे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाच्या मूळापर्यंत आम्ही जाऊ. तिच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे का हे शोधून काढू. पण काही वेळेला अशा प्रकरणाचं राजकीय भांडवल केलं जातं. केवळ बदनामीसाठी राजकारण करू नका, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. आम्ही पूजाच्या कुटुंबीयांना भेटलो तर त्यांच्यावर दबाव आणतो की काय असा संशय निर्माण होऊ शकतो. तसा कांगावा होऊ शकतो. पण पूजा प्रकरणी आवाज उठवणाऱ्या सामाजिक संघटना तिच्या कुटुंबाला का भेटल्या नाही, असा सवालही त्यांनी केला.

थेट निष्कर्षापर्यंत जाणं चुकीचं

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण थेट निष्कर्षापर्यंत जाणं चुकीचं आहे. योग्यरितीने या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. सत्य लपवलं जाणार नाही. चौकशीतून सत्य उघड होईल. राज्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होईल आणि या मुलीला न्याय मिळेल, असं त्या म्हणाल्या.

कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही

धनंजय मुंडे आणि पूजा चव्हाण प्रकरणात फरक आहे. मुंडे प्रकरणात तक्रार करणाऱ्यांनी विविध विधाने केली होती. त्यानंतर आणखी काही माहिती पुढे आली होती, असं सांगतानाच पूजाच्या प्रकरणातही बदनामीचं राजकारण होता कामा नये. न्यायाची कायदेशीर चौकट सांभाळूनच न्याय होईल. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

लीक माहितीवर बातमी देताना काळजी घ्या

लीक होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घ्या. याआधीच्या प्रकरणात अशाच लीक माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागलं. या प्रकरणात असं होऊ नये त्यामुळे लीक माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची वरिष्ठांकडून खातरजमा करा, असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला. (neelam gorhe reaction on Pooja Chavan Suicide Case)

 

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आत्महत्या नाही तर पूजा चक्कर येऊन पडली?

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाणप्रकरणी अटक केलेल्या दोघांना दोन तासांत का सोडलं?, ही मोगलाई आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

(neelam gorhe reaction on Pooja Chavan Suicide Case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI