Pune By Election 2023 : कसबा पेठ- पिंपरी चिंचवडमधून कुणाला उमेदवारी?

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे.

Pune By Election 2023 : कसबा पेठ- पिंपरी चिंचवडमधून कुणाला उमेदवारी?
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 12:08 AM

पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्यातल्या कसबा पोटनिवडणुकीत कुणाविरुद्ध कोण असेल, याची चर्चा सुरुय. तूर्तास तरी कमळ हे चिन्हच कसब्यात भाजपचा चेहरा असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. पुण्यात टिळक कुटुंबीयांपैकी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आहे. मात्र उमेदवार कोण असेल याचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून दिवंगत मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक, हेमंत रासने, गिरीश बापटांच्या सून स्वरदा बापट आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. आजच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय.

दुसरीकडे काँग्रेसमधून अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमला व्यवहारे या तिघांची नाव पुढे केली जातायत. विशेष म्हणजे संधी मिळाली तर लढू असं सांगून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे-पाटील सुद्धा कसब्यातून लढण्यास इच्छूक असल्याचं बोललं जातंय

हे सुद्धा वाचा

कसबा पेठ हा आघाडीच्या वाटपात काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेल्यावेळेस काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळकांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे यंदा नेमका कुणाविरुद्ध कोण सामना होतं., हे पाहणं महत्वाचं आहे.

इकडे चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांचं निधन झाल्यानं इथंही दोन नावं चर्चेत आहेत. भाजपकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची नाव चर्चेत आहेत.

दुसरीकडे चिंचवडची जागा ही राष्ट्रवादी लढवते. मात्र गेल्यावेळेस इथं राष्ट्रवादीनं उमेदवार न देता अपक्ष राहिलेल्या राहुल कलाटेंना पाठिंबा दिला होता.

2009 च्या विधानसभेवेळी गिरीश बापट इथले आमदार होते.2014 ला पुन्हा गिरीश बापट निवडून आले आणि 2019 ला दिवंगत मुक्ता टिळक कसबामधून जिंकल्या होत्या.

कसबा मतदारसंघात प्रामुख्यानं येणाऱ्या भागांमध्ये शनिवार वाडा, सोमवार पेठचा काही भाग, नारायण पेठ, सदाशिव पेठ, दांडेकर पूल, मंडईची मुख्य बाजारपेठ, नवी पेठ आणि लोकमान्य नगरचा भाग येतो.

कसबा पेठेतल्या जातीय समीकरणात मराठा आणि ओबीसी वर्ग ३५ टक्के आहे, ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के, मागासवर्गीय समाज 18 टक्के तर मुस्लीम समाज 10 टक्के आहे.

चिंचवड विधानसभेतलं जातीय समीकरण

चिंचवड विधानसभेतलं जातीय समीकरण पाहिलं तर इथं मागासवर्गीय समाज २० टक्के, ब्राह्मण समाज १५ टक्के, मराठा समाज ५२ टक्के, माळी समाज ७ टक्के, तर मुस्लिम मतं ५ टक्के आहेत.

मागचे २० वर्ष चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप प्रतिनिधीत्व करत होते. 2009 च्या विधानसभेवेळी ते अपक्ष आमदार झाले. 2014 साली भाजपच्या तिकीटावर आणि 2019 साली पुन्हा भाजपकडून ते आमदार झाले.

चिंचवड विधानसभा भागात पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर , वाकड, चिंचवडगाव , थेरगाव, डांगेचौक, काळेवाडी आणि रहाटणी हे प्रमुख भाग येतात.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.