सोलापुरात लग्नाचं काम अवघड होणार, नियम मोडल्यावर कार्यालयासकट वऱ्हाडींवरही गुन्हा दाखल होणार

सोलापुरात लग्नसमारंभातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचं पुढे आल्यानंतर आता लग्नांवरील निर्बंध कडक केले गेले आहेत. | Solapur Corona

सोलापुरात लग्नाचं काम अवघड होणार, नियम मोडल्यावर कार्यालयासकट वऱ्हाडींवरही गुन्हा दाखल होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक निर्बंध
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 1:09 PM

सोलापूर : सोलापुरात वाढती कोरोना रुग्णसंख्या ((rising Corona inferction in Solapur) प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलीय. रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. लग्नसमारंभातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचं पुढे आल्यानंतर आता लग्नांवरील निर्बंध कडक केले गेले आहेत. त्यानुसार कोरोनाचे नियम पायळी तुडवले तर मंगल कार्यालयांच्या मालकांसहित वधू वर पालक आणि वऱ्हाडी मंडळींवरही गुन्हा दाखल केला जाईल, अशा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. (rising Corona inferction in Solapur Rules And regulation For Wedding Ceremony)

नियम मोडले तर वऱ्हाडींवरही गुन्हा

सोलापुरातील गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयावरील निर्बंध कडक केले गेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभात ज्या मंगलकार्यालयात गर्दी होते ते मंगल कार्यालय तात्काळ सील करण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. जी मंगल कार्यालये किंवा वऱ्हाडी मंडळी कोरोना नियमांचं उल्लंघन करतील त्या संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच पालिका आणि प्रशासनाने घालून दिलेले कोरोनासंबंधीचे नियम पाळणं आता सक्तीचं करण्यात आलं आहे.

सोलापुर जिल्ह्यात सध्या 1742 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखीन कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

प्रशासनाच्या उपाययोजना काय?

सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढले असून रुग्णांच्या उपचारासाठी शहर आणि ग्रामीण भागांत जवळपास साडे 18 हजार बेड्ची सोय केलेली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली आहे.

मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री कोरोना काळात आपल्याला उपयोगी ठरणार आहे. इथून पुढेही याच तिसूत्रीनुसार आपल्याला काम करावं लागणार आहे, असं सोलापूरचे जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी म्हणाले.

सध्या शहर आणि ग्रामीण भागात लसीकरण सुरु आहे. मात्र तरीही रुग्ण वाढल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणं महत्त्वाचं बनलं आहे. बाहेर जाताना मास्क लावणं गरजेचं आहे. तसंच वारंवार सॅनिटायझर आणि हात धुत राहणे महत्त्वाचं आहे.

नाशिकमध्ये ‘नो शुभमंगल, ओन्ली सावधान’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशकात इथून पुढचे काही दिवस विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत शहरातील विवाह सोहळ्यांवर पूर्णत: बंदी असेल.

शहरात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यानुसार आता शहरात नो शुभमंगल ओन्ली सावधान असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयापर्यंत ही बंदी असणार आहे.

(rising Corona inferction in Solapur  Rules And regulation For Wedding Ceremony)

हे ही वाचा :

नाशिकमध्ये ‘नो शुभमंगल, ओन्ली सावधान’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.