Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आग पुन्हा भडकली, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी परिसरातील नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे.

Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आग पुन्हा भडकली, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी परिसरातील नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे. दुपारी 2 च्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 2 ते 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. त्यानंतर कुलिंगचं काम सुरु करण्यात आलं. पण संध्याकाळी 7 वाजता या इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग पुन्हा भडकली. ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.(The fire in the new building of the Serum Institute flared up again)

आगीत 5 जणांचा मृत्यू

सुरुवातीला या आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली होती. पण आग विझवल्यानंतर केलेल्या पाहणीत आगीमध्ये 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते.

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली : राजेश टोपे

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि तिथे इन्सुलिनचं भरपूर मटेरियल होतं. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली. महापालिकेचे 5 टँकर आणि तीन आणखी वाटर टँकर तात्काळ बोलावण्यात आले. संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास लागलेत. आता पूर्णतः आग विझलेली आहे. सगळं आता नियंत्रणात आहे. संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिलं. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहितीसुद्धा राजेश टोपे यांनी दिलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणी करणार

आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अदर पुनावाला यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. आगीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी करणार असल्याचं कळतंय.

कोव्हिशील्ड लस सुरक्षित

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली होती. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली होती. मात्र, सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही़. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि अदर पुनावाला यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

वेल्डिंगच्या कामामुळे सीरमच्या इमारतीला आग लागल्याची शक्यता : महापौर मुरलीधर मोहोळ

Serum Institute Fire : सीरमची आग शॉर्टसर्किटमुळे, कोव्हिशील्ड लस सुरक्षित- मुख्यमंत्री

Serum Institute Fire : धक्कादायक! सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

The fire in the new building of the Serum Institute flared up again

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI