पिंपरी-चिंचवड: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसैनिकांना पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची सत्ता आणण्याचं आवाहन केलं. तसेच शिवसैनिकांना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? शिवसेनेसाठी महापालिकेचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे, हे सांगतानाच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत कशी पोहोचली याचं गमकच संजय राऊतांनी शिवसैनिकांना सांगितलं. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही त्यांनी थेट आव्हान दिलं. (shivsena is successful because of bmc and thane corporation, says sanjay raut)