AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar: अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका… सुनेत्रा पवार कुणावर कडाडल्या?

Someshwar Sugar Factory Election : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कडाडल्या. त्यांनी अजितदादाचं नाव आणि फोटो न वापरण्याचा इशारा दिला.

Sunetra Pawar: अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका... सुनेत्रा पवार कुणावर कडाडल्या?
सुनेत्रा पवार
| Updated on: Oct 04, 2026 | 8:25 AM
Share

Sunetra Pawar: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला. राष्ट्रवादीचं अगोदरच दोन शक्कल झालेली असताना दादांचे निकटवर्तीय आणि विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान प्रचाराचा श्रीफळ वाढवल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठे वक्तव्य केले. अजित दादांचे नाव आणि फोटो न वापरता स्वकर्तृत्वावर निवडणूक लढण्याचा इशारा त्यांनी जगताप यांनी दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा, राष्ट्रवादी शरद पवार आणि भाजपच्या पाठिंब्यावर पुरूषोत्तम जगताप यांचे पॅनल आहे.

शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ आज तुम्ही या ठिकाणी आला आहात. गर्दी पाहून माझा ऊर भरून आला आहे. दादांच्या प्रेमापोटी विजय निश्चीत होता.अजितदादांच्या नंतरच्या निवडणुकीसाठी हा प्रतिसाद हा आधार महत्वाचा आहे. श्री सोमेश्वरचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला आहे त्यामुळे आपण आजपर्यंत प्रवास करू शकलो आहे. आपल्या सर्वांचे आधारवड होते अशा दादांना विनम्र अभिवादन करते. मी उभी आहे सोमेश्वर कारखान्याच्या भविष्यासाठी बोलण्यासाठी, सोमेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या घामातून उभ राहिलेलं घर आहे, असे पवार म्हणाल्या.

अजितदादांच्या आठवणींना उजाळा

दादांचा जाऊन एकही वर्ष झालं नाही. बांध सुना झाला. शेती सुनी झाली. प्रत्येक ठिकाणी त्यांचा आठवणी आहेत. दादांचा सोमेश्वरवरती पोटच्या पोरांप्रमाणे जीव होता. अत्यंत तरुणपणी दादानी छत्रपती कारखान्यातून राजकीय सुरुवात केली. दादा स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्याच्या गरजा तळमळ शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे या साठी दादांचे प्रयत्न सुरू होते १९९२ साली सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दादांच्या ताब्यात आला. अलीकडच्या काळात सोमेश्वर कारखाना डबघाईला आला होता. पण दादानी त्यासाठी आमदारकी पणाला लावली. दादानी कधी स्वतःची पाठ थोपटून घेतली नाही, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा

वाहिनी लोकांमध्ये खूप संभ्रम आहे दादा काही झालं की शब्द द्यायचे आता कोण सोडवणार असं मला विचारलं, मी उत्तर दिलं मी आहे ना. दादांनी सोमेश्वरसाठी खूप गोष्टी केल्या कुठलाही एक्स्पँशन आपोआप होत नाही प्रस्ताव सादर करावे लागतात. या सगळ्या गोष्टी केल्या शिवाय खाली कोणत्या गोष्टी येत नाहीत. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी कमी पडू नये म्हणून लक्ष असायचं. आपल्या ताब्यात जिल्हा बँक आहे. त्यामुळे आर्थिक अडचण भासू नये यासाठी प्रयत्न केलं जातात. हा कारखाना कोण एका व्यक्तीची मालमत्ता नाही सभासदांचा कारखाना आहे. काही मंडळी कारखान्याच्या विकासाच श्रेय घेत असतील पण ते श्रेय सभासदांचं आहे, असे त्या म्हणाल्या.

ही निवडणूक दादांच्या पश्चात पहिलीच निवडणूक आहे. आम्ही खूप प्रयत्न करत होतो जे झालं ते तुमच्या सगळ्या समोर आहे २१ जागा होत्या अर्ज ३५० होते सगळ्यांनी अर्ज भरले होते पक्षाच्या वतीने मी मुलाखती घेतल्या. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर अजितदादांच नाव वापरणं बंद करावं. दादांच्या नेतृत्वाचा उपयोग करू नये. त्यांचा नावावर चुकीच्या गोष्टी खपवायच्या. नाव दादांचं आणि नाराजी कुटुंबावर, अशी टीका त्यांनी विद्यमान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्यावर केली.

जी स्वप्न घेऊन दादांनी कारखाना जीवापाड जपला तो विश्वास मला जपायचा आहे. सर्वात जास्त दर देणारा कारखाना म्हणून. ओळख ठेवायची आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका मी कुणाला तरी चेअरमन करणार आहे मी सांगू इच्छिते मी या २१ उमेदवारांना विश्वासात घेऊन चेअरमन ठरवणार आहे.चेअरमन हा नाव गाजविणारा नसेल तर भाव गाजविणारा असेल. ११ तारखेला आपलं चिन्ह आहे कपबशी जास्तीत जास्त सभासदानी मतदान करावे. आपण सगळेजण सभासद जास्तीत जास्त मताने विजयी कराल अशी खात्री बाळगते, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर