आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं?, आई म्हणून खूप वाईट वाटतं: सुप्रिया सुळे

आर्यन खानने ड्रग्ज घेतलं नव्हतं तर मग त्याला 25 दिवस तुरुंगात का ठेवलं? असा सवाल करतानाच एक आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. (supriya sule reaction on aryan khan arrest)

आर्यन खानला 25 दिवस कोठडीत का ठेवलं?, आई म्हणून खूप वाईट वाटतं: सुप्रिया सुळे
Supriya Sule
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 3:54 PM

पुणे: आर्यन खानने ड्रग्ज घेतलं नव्हतं तर मग त्याला 25 दिवस तुरुंगात का ठेवलं? असा सवाल करतानाच एक आई म्हणून या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. शाहरुख खान हा आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. अशाने भारताचं नावही खराब होतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे विधान केलं. आर्यन खाननं ड्रग्ज घेतलं नाही. मुलाकडे काहीच सापडलं नाही. एखादा मुलगा निर्दोष असेल तर मग त्याला 25 दिवस कोठडीत का ठेवलं? आई म्हणून मला त्याचं वाईट वाटतं. शाहरूख खानं हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारलं जातं. पण अशा प्रकरणाने भारताचंही नावं खराब होतं. चुक नसतानाही अधिकारी कारवाई करत असेल तर चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आमच्या तोंडी अशी भाषा नसते

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. आमच्या तोंडी अशी भाषा नसते. अशी भाषा आमच्या वाचनात नाही, असा टोला त्यांनी लगावला.

हारजीत होतच असते

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काय होतंय ते बघू, असं सांगतानाच निवडणुकीत हारजीत होतच असते. मात्र, आम्ही दडपशाहीचं राजकारण करत नाही. ईडीच्या मार्फत नोटीसा पाठवण्याचे प्रकारही कधी केले नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

प्रचाराला लागा

यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

सिलिंडरचे दर कमी करून भाऊबीज द्या

इंधन दरवाढीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. भाऊबीजेच्या दिवशी महिला आंदोलन करणार आहेत. सिलिंडचे दर कमी करुन भाऊबीज द्या, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!

‘कोणत्या दूध संघानं किती पैसे लाटले याचा हिवाळी अधिवेशनात भांडाफोड करणार’, विखे-पाटलांचा थोरातांना इशारा

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विटरवरुन माहिती

(supriya sule reaction on aryan khan arrest)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.