पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या नावाने रॅप साँग व्हायरल, वकिलाने दावा फेटाळला

पुणे अपघातामधील आरोपी असलेला वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वेदांतने आपल्या इन्स्टावर रॅप साँग गायल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याच्या कुटुंबियांना हा व्हिडीओ त्याचा नसल्याचा दावा केला आहे.

पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या नावाने रॅप साँग व्हायरल, वकिलाने दावा फेटाळला
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 3:12 PM

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण  प्रकरण चर्चेत असताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण रॅप साँग गात असलेला दिसत असून त्यामध्ये तो रॅपमधून लोकांना शिव्या देत आहे. या रॅप साँगमध्ये, हो मी बिल्डरचा पोरगा आहे म्हणून बेलवर सुटलोय, असं म्हणत त्यानंतर रॅपमधील तरूण अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओमधील तरूण परत एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे. व्हिडीओमध्ये लोकांना शिवीगाळही केली जात आहे. मात्र हे रॅप साँग मुलाचं नसल्याचा दावा बिल्डरच्या मुलाचा वकील आणि कुटुंबियांनी केला आहे.

पुण्यातील हिट अँड रनचं प्रकरण ताजं असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील तरुण अर्वाच्च भाषेत बोलताना दिसत आहे. शिवीगाळ करताना दिसत आहे. तो कारमध्ये बसलेला आहे. हा तरुणही अल्पवयीन असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहताना तो अपघातातील आरोपी बिल्डरचा मुलगा आहे की काय? असं वाटतं. पण हा व्हिडीओ त्याचा नाही. मात्र व्हिडीओ त्याचाच आहे, असं सांगून व्हायरल केला जात आहे. त्यावर कुटुंबीयांनी आणि वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. चुकीचे व्हिडीओ व्हायरल करून बदनामी थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे. संबंधित व्हिडीओची पुष्टी ‘टीव्ही 9 मराठी’ करत नाही. हा व्हिडीओ तांत्रिक गोष्टींचा वापर करुन बनवण्यात आल्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही.

काय आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण?

या प्रकरणामधील बिल्डरच्या मुलाला 14 दिवस बाल कारागृहात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे.  पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे. कारण जबाबात एकसूत्रता आहे का हे पाहण्यासाठी तिघांची चौकशी केली जाणार आहे.

पुण्यामध्ये अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. यावरून पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.  पोलिसांनी पैसे खाल्ले म्हणून अगरवार कुटुंबाची एवढी डेरिंग होतीय. पुण्यात पत्रकाराला मारहाण होतीय हे दुर्दैव आहे. आयुक्तांनी कारवाई करावी अन्यथा उद्या आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....