AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड उकाड्यातून होणार सुटका,उद्यापासून तापमानात होणार घट, हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमान प्रचंड वाढले आहे. मात्र, आता या तापमानात उद्यापासून काहीशी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रचंड उकाड्यातून होणार सुटका,उद्यापासून तापमानात होणार घट, हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
Temperatures will drop
| Updated on: May 29, 2026 | 5:21 PM
Share

वाढत्या उष्णतेपासून विदर्भवासीयांना आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमान ४७ अंशाकडे पोहचले होते. त्यामुळे असह्य उन्हाचे चटके विदर्भवासियांना बसत होते.आता मात्र,उद्यापासून या उन्हाच्या चटक्यांपासून विदर्भवासियांची सुटका होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.त्यामुळे वाढलेल्या तापमानापासून विदर्भवासीयांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

उद्यापासून विदर्भातील तापमानात काही प्रमाणात घट होऊन कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशी एक शक्यता वर्तवण्यात आहे की विदर्भाच्या वाढलेल्या तापमानात घट होणार आहे. तापमानात जवळपास चार ते पाच डिग्रीपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवस विदर्भातील तापमान प्रचंड वाढले होते. काही जिल्ह्यांना तर रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.आता विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान काही अंशाने घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

येथे पोस्ट पाहा –

गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून विदर्भातील तापमानात वाढ झाली होती. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काहींमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले होते. आता या जिल्ह्यांतील तापमान सुद्धा काही अंशाने घटण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांचे तापमान 47 पर्यंत पोहोचल होते. ते आता 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उतरण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये 40 च्या खाली सुद्धा तापमान येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

येथे पोस्ट पाहा –

येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे.मात्र, या सगळ्यांमध्ये जी उष्णतेच्या लाटेचे वातावरण बनले होते, त्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.विदर्भात ढगाळ वातावरणाची निर्मिती सुद्धा होऊ शकते. बंगालच्या खाडीतून सुद्धा एक पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे असह्य उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट