AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Calf Rescue Video : अंबरनाथमध्ये दरीत अडकलेल्या गायीच्या वासराचं रेस्क्यू ऑपरेशन, स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं

एका तरुणाने दरीत उतरून या गाईच्या वासराचे हातपाय दोरीने बांधले. तर इतर 10 ते 15 तरुणांनी या वासराला दोरीच्या सहाय्याने डोंगराच्या वर ओढलं आणि सुरक्षितपणे त्याची सुटका केली.

Ambernath Calf Rescue Video : अंबरनाथमध्ये दरीत अडकलेल्या गायीच्या वासराचं रेस्क्यू ऑपरेशन, स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं
अंबरनाथमध्ये दरीत अडकलेल्या गायीच्या वासराचं रेस्क्यू ऑपरेशनImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 12:22 AM
Share

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात एका दरीत पडलेल्या गाईच्या वासरा (Calf)ला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation)चा व्हिडिओ समोर आला असून यानंतर या धाडसी तरुणांचं कौतुक होत आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या वावंजे परिसरात एका दरी (Valley)त 3 ते 4 दिवसांपासून एक गाईचं वासरू पडलं होतं. या वासराला पुन्हा वर येणं शक्य नव्हते. त्यामुळे ते तिथेच अडकून पडले होते. या घटनेची माहिती मलंगगड परिसरातील काकडवाल गावातल्या स्थानिक तरुणांना मिळाली. त्यानंतर या तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत वासराची सुटका केली.

रेस्क्यू ऑपरेशन मोबाईल कॅमेऱ्यात कैद

तरुणांनी या वासराला वाचवण्याचा निश्चय करत मलंगगड डोंगर गाठला. तिथे त्यांच्यापैकी एका तरुणाने दरीत उतरून या गाईच्या वासराचे हातपाय दोरीने बांधले. तर इतर 10 ते 15 तरुणांनी या वासराला दोरीच्या सहाय्याने डोंगराच्या वर ओढलं आणि सुरक्षितपणे त्याची सुटका केली. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनची दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत. हा व्हिडिओ समोर आला असून यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून मुक्या जीवाला वाचवणाऱ्या या धाडसी तरुणांचं कौतुक होतंय.

सिंधुदुर्गात नदीत वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवले

आंबोलीत सेल्फीच्या नादात तोल जाऊन नदीत वाहत जाणाऱ्या महिलेचे प्राण जीवावर पोलिसाने उदार होऊन वाचविले आहेत. आंबोली येथे कणकवलीवरून पर्यटनासाठी आलेल्या जानवी शिंदे हिरण्यकेशी नदी किनारी सेल्फी घेत असताना तोल जाऊन नदीत पडल्या. त्यांना वाहत जाताना पाहून त्यांच्या मुलाने व नवऱ्याने आरडाओरडा केला. अंदाजे 200 मीटर वाहत गेल्यानंतर जानवी यांना नदीतील एक झुडूप हाताला लागलं. त्या झुडपाला धरून जानवी ओरडत राहिल्या. तोपर्यंत रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन आंबोली पोलीस स्थानकाचे हवालदार दत्ता देसाई यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेऊन त्या महिलेला दोरखंडाच्या साहाय्याने नदीकिनारी आणलं. पोटात पाणी गेल्यामुळे व घाबरल्यामुळे महिलेला तातडीने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र पोलीस हवालदाराने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Rescue operation of a cow calf trapped in a valley in Ambernath)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.