Maval CCTV | भरधाव वेगात रिव्हर्स घेतला टेम्पो, गाडीची अनेकांना ठोकर

Maval CCTV | भरधाव वेगात रिव्हर्स घेतला टेम्पो, गाडीची अनेकांना ठोकर

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 3:51 PM

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळात (Maval) एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवली. निमुळता मार्ग असल्याने गाडीची अनेकांना ठोकर बसली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यातदेखील कैद झालीय.

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळात (Maval) एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवली. निमुळता मार्ग असल्याने गाडीची अनेकांना ठोकर बसली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यातदेखील कैद झालीये. अपघात झाल्याने पळून जाताना त्याने हे कृत्य केले. नवलाख उंबरे गावात ही घटना 9 मार्चला घडली आहे. रिव्हर्स जाण्याआधी टेम्पो चालकाने एकाला धडक दिल्याने त्या व्यक्तीचा मृत्यूही झाला. आता ग्रामस्थ आपल्याला मारतील या भीतीने त्याने रिव्हर्स गाडी हाकली. यातही अनेकांचे नुकसान झाले. काही जखमीही झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे, की रस्ता खूपच निमुळता आहे. रस्त्यावर रहदारीदेखील दिसत आहे. अशाच टेम्पोचालक भरधाव पद्धतीने रिव्हर्स येत आहे. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या अनेकांना दुखापत झाली, तर गाड्यांचेही नुकसान झाले.