AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित आर्या प्रकरणात मोठी अपडेट! आर्थिक व्यवहार तपासले जाणार असून पत्नीचाही..

पवईतील ओलीस नाट्याचा सुत्रधार रोहित आर्या याने सुमारे 3 महिन्यांपूर्वी हा संपूर्ण कट रचून त्याची पूर्वतयारी सुरू केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. पवई पोलिस या प्रकरणात जबाब नोंदवत आहेत.

रोहित आर्या प्रकरणात मोठी अपडेट! आर्थिक व्यवहार तपासले जाणार असून पत्नीचाही..
Rohit Arya
| Updated on: Nov 02, 2025 | 10:41 AM
Share

रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुंबईतील पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी मुलांना वाचवताना रोहित आर्याचा एनकाउंटर केला. आता रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाव पोलिस नोंदवून घेणार आहेत. रोहित आर्याची एनकाउंटर आधीची मानसिक स्थिती समजून घेण्याचा पोलिस प्रयत्न करणार आहेत. त्याची मानसिक स्थिती कशी होती हे समजून घेण्यासाठी गुन्हे शाखा तज्ञांची मदत घेणार आहेत. रोहित आर्याच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवून तो या सगळ्या घटनेआधी कसा होता? मानसिक स्थिती काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

घटनेच्या दिवशी रोहित आर्या खूप पॅनिक झाला होता. पोलीस त्याच्याशी बोलत असताना अचानक तो चिडून फोन कट करायचा आणि मुलांना ओलीस ठेवलेल्या भागात सारख्या फेऱ्याही मारत होता असेही पोलिसानी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी तीन ते चार जणांचे जबाब नोंदवले असून लवकरच आर्याच्या पत्नीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. रोहित आर्याची पत्नी आणि मुलगा मागील काही दिवसापासून अहमदाबादला राहत होते. आर्या एकटाच भाड्याने घेतलेल्या घरात चेंबुरमध्ये राहत होता.

या प्रकरणात मृत आरोपी रोहित आर्याच्या कुटुंबांनी माैन बाळगले आहे. पवईतील ओलीस नाट्याचा सुत्रधार रोहित आर्या याने सुमारे 3 महिन्यांपूर्वी हा संपूर्ण कट रचून त्याची पूर्वतयारी सुरू केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने संबंधिताचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. रोहितच्या मृतदेहावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित आर्याने गुरुवारी चित्रिकरणाच्या निमित्ताने मुलांना पवईच्या आर.ए. स्टुडियोत मुलाखतीसाठी बोलावले होते.

नंतर 17 मुलांना ओलीस धरले होते आणि यावेळी चित्रफित प्रसारित करून त्याने आपली भूमिका मांडली. सुमारे अडीच तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी केलेल्या कारवाईत रोहितचा आर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोहित आर्याविरोधात हत्येचा प्रयत्न, अपहरण आदी कलमांअतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखा-2 आर्याच्या मृत्युचा आणि गुन्हे शाखा- 8 चे पथक संपूर्ण ओलीस नाट्याच्या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

रोहित आर्याचा एनकाउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला आहे. गुन्हे शाखेच्या तपास पथकाने नोंदवला जबाब. रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, त्यावेळी परिस्थितीच तशी निर्माण झाल्याने गोळीबार केल्याच एपीआय वाघमारे यांनी जबाबात सांगितले. रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहे. गुन्हे शाखा रोहित आर्याचे सर्व आर्थिक व्यवहारही तपासणार.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.