Russia Ukraine War | ‘युक्रेनमध्ये अडकलेल्या Bhandara जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे’

Russia Ukraine War | ‘युक्रेनमध्ये अडकलेल्या Bhandara जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे’

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 5:26 PM

युक्रेनमधील (Ukraine) युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी (Students) अडकले आहेत. भंडारा (Bhandara) जिल्हातील चार विद्यार्थी अडकलेली आहेत. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, असे पालकांचे म्हणणे आहे.

युक्रेनमधील (Ukraine) युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी (Students) अडकले आहेत. भंडारा (Bhandara) जिल्हातील चार विद्यार्थी विनोद ठवकर, हर्षीत चौधरी, श्रेयस निर्वाण व निकिता भोजवानी हे विद्यार्थी  युक्रेनमध्ये अडकलेली आहेत. लव्हिव्ह शहारात वेस्टन पार्टमध्ये हर्षीत वास्तव्यला असून तिथे लव्हिव्ह विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी 13 डिसेंबर 2021ला गेला होता. हर्षीत प्रथम वर्षाला शिक्षण घेत असून लव्हिव्ह शहरात आज सकाळी युद्ध सायरन वाजल्याने तिथे हॉस्टेलमध्ये वास्तव करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली. त्यामुळे तेथील अनेक विद्यार्थ्यांनी बाजूला असलेल्या चर्चमधील बंकरमध्ये आसरा घेतला होता, भंडारा जिल्ह्यातील सध्याचा घडीला चार विद्यार्थी अडकलेले आहेत. देशातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, असे पालकांचे म्हणणे आहे.