राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जातंय, सामना अग्रलेखातून शिवसेनेचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या विनामवापरावरुन मोठा वाद झाल्यानंतर आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून पुन्हा एकदा राज्यपालांवर टीका केली आहे. (saamana Bhagat Singh Koshyari airplane permission)

राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जातंय, सामना अग्रलेखातून शिवसेनेचा गंभीर आरोप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 7:19 AM

मुंबई : राज्यपालांच्या विमान वापरावरुन मोठा वाद झाल्यानंतर आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून पुन्हा एकदा राज्यपालांवर टीका केली आहे. “राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे,” असा आरोप करत यामध्ये राज्यपालांचेच अधःपतन सुरू असल्याचं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. (saamana criticizes governor Bhagat Singh Koshyari on airplane permission)

“राज्यपालच काय , मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही . मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच पुठे ? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे . राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे. त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू आहे,” सामनाने म्हटलंय.

राज्यपाल स्वत:च्याच कासोट्यात पाय गुंतून का पडत आहेत ?

यावेळी शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्यपाल यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. यावेळ ते इतके चर्चेत कधीच आले नव्हते. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत पिंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही व राज्यपालांनी तर शहाण्यासारखे वागावे असे संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत? आता ताज्या प्रकरणात श्रीमान राज्यपाल महोदय सरकारी विमानाच्या वापरावरून चर्चेत आले आहेत. राज्यपाल महोदयांना सरकारी विमान उडवत त्यांच्या स्वराज्यात म्हणजे डेहराडूनला जायचे होते. पण महाराष्ट्र सरकारने त्यांना विमान वापरण्यास परवानगी दिली नाही. राज्यपाल महोदय गुरुवारी सकाळी विमानात जाऊन बसले. पण उड्डाणाची परवानगीच नसल्यामुळे त्यांना खाली उतरावे लागले व प्रवासी विमानाने डेहराडून वगैरे भागात जावे लागले. आता या सर्व प्रकरणावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आपटाआपटी करीत सरकारला धारेवर धरत असेल तर विरोधी पक्षाने पहिल्या धारेची मारून वचवच सुरू केली आहे असेच म्हणावे लागेल. राजभवन व सरकार यांच्यात आता या विषयावर वादावादी सुरू आहे. त्यात ‘बीच मे मेरा चांदभाई’ थाटाने भाजपने बांग दिली.” अशी बोचरी टीका शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच, राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितली व एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारूनही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले? असा हटवादीपणा करण्याचे कारण काय? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

यावेळी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शिवसेनेने टीका केली आहे. “राज्यपालांना विमान नाकारले हा सरकारचा अहंकार असल्याचा टोला श्री. फडणवीस यांनी मारला. भाजप नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार पृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय? असा सवाल सामना अग्रलेखात केला आहे.

इतर बातम्या :

राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही, छगन भुजबळ यांचा घणाघात

राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही, छगन भुजबळ यांचा घणाघात

(saamana criticizes governor Bhagat Singh Koshyari on airplane permission)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.