Ramdas Athawale : आम्हीच एकत्र येत नाही, तर ते कसे…. रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीच्या एकीचा विषय असा संपवला

Ramdas Athawale on NCP : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मंत्रिपद आणि एक विधान परिषद द्यावे अशी मागणी केली आहे. लोकसभेला आम्हाला एकही जागा मिळाली नाही, असे ते म्हणाले. संविधानावरून मोर्चा आणि नंतर कोम्बिंग ऑपरेशनप्रकरणात ते परभणीत आले असता, त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.

Ramdas Athawale : आम्हीच एकत्र येत नाही, तर ते कसे.... रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीच्या एकीचा विषय असा संपवला
रामदास आठवले, शरद पवार, अजित पवार
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 7:57 PM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मंत्रिपद आणि एक विधान परिषद द्यावे अशी मागणी केली आहे. लोकसभेला आम्हाला एकही जागा मिळाली नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घटनांवर त्यांचे मत व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी एक मोठी खंत पण बोलून दाखवली. त्याची आता राज्यात चर्चा होत आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावरून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा केली. या सर्व घडामोडींवर आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं. काय म्हणाले आठवले?

परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानाप्रकरणानंतर मोर्चा निघाला. त्याला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले परभणीत आले होते. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमविरोधातील वातावरण, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मंत्रिमंडळात जागा मिळावी या आणि इतर मुद्यावर त्यांचे मत मांडले.

आम्हीच एकत्र येत नाही तर…

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी अशा भावना व्यक्त झाल्या. अनेकांनी राष्ट्रवादीच्या एकीवर चर्चा केली. मत व्यक्त केले. याविषयी रामदास आठवले यांनी सुद्धा मत व्यक्त केले.

यावेळी त्यांनी एक मोठी खंत सुद्धा व्यक्त केली. आम्हीच एकत्र येत नाही तर ते (अजित पवार शरद पवार) असा मिष्कील टोला त्यांनी हाणला. दोघे एकत्र आल्यास माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी यावेळी जणू त्यांच्या मनातील खंतही बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांना आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आंबेडकर चळवळीने एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी या ऐकीसाठी आपल्याला कोणतेही मोठे पद नको, अशी भावना व्यक्त केली होती. पण त्यांच्या या मुद्दावर पुढे चर्चा झाली नाही. त्याची खंत आज त्यांच्या वक्तव्यातून समोर आले.

जनतेने काँग्रेसला नाकारले

यावेळी त्यांनी नितीन राऊत मित्र आहेत, मात्र ते काँग्रेसचे आहेत, असा टोला हाणला. राहुल गांधींनी यांनी संविधान पुस्तक दाखवून लोकसभेला मते मिळवली, मात्र विधानसभेत ते चालले नाही, 237 जागा आमच्या आल्या, ते आता EVM चा विरोध करत आहेत. दलित, ओबीसी आणि मराठा समाजाने आम्हाला मतदान केले. लोकांनी त्यांना नाकारले आहे, असे सांगीतले.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.