Raj Thackeray : संजय राऊत हे शरद पवारांच्या अमंगल कार्यातील करवली; राज ठाकरे यांची खोचक टीका

Raj Thackeray on Sanjay Raut : राज ठाकरे यांनी विधानसभेपूर्वीच महाविकास आघाडीतील नेत्यांवर तोफ डागली. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसूख घेतल्यानंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मोर्चा वळवला.

Raj Thackeray : संजय राऊत हे शरद पवारांच्या अमंगल कार्यातील करवली; राज ठाकरे यांची खोचक टीका
संजय राऊत राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 3:13 PM

राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अखेरच्या टप्प्यात त्यांनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली. तर महाविकास आघाडीतील नेत्यांवर तोंडसूख घेतले. आपल्या दौऱ्यात मुद्दामहून अडथळे आणल्या जात आहेत. जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसूख घेतले. तर खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली.

महायुतीत सहभागी होणार का?

लोकसभेत राज ठाकरे यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. तर निवडणुकीत एकही उमेदवार त्यांनी उभा केला नव्हता. विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. विधानसभेच्या सर्व जागा लढण्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. मराठवाड्यातील दौऱ्याच्या अखेरच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महायुतीत सहभागाविषयी त्यांनी भूमिका जाहीर केली. तीन लोकांची एक कंपनी आहे. त्यांचे स्टेक ठरले नाही. कुठे चौथा पार्टनर घेणार?, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

निवडणुकीपूरताच पुळका

जरांगेंचं आंदोलन सुरू असताना तिथे मी बोललो होतो. तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. राज्यातील मराठा समाजाचा विषय येत नाही. मग इतर राज्यांचाही विषय येतो. त्यामुळे हा विषय काढायला कोणी तयार नाही. माझं सांगणं समाजाला आहे. हे विष कालवत आहेत. त्यांना तुम्ही थारा देऊ नका. एवढं माझं म्हणणं आहे. साडे तीन महिन्यानंतर हे कोणी नसणार. यांचं काम अटोपलेलं असेल, असा आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी निवडणुपूर्वी या दोन्ही नेत्यांना इशारा पण दिला. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवला. संजय राऊत हे शरद पवारांची करवली आहे. अमंगल कार्याची करवली आहे. त्यांच्या उंबरठ्यावर बसून तिथेच आयुष्य झिजवणार. ते सोंगटी आहेत, असा हल्लाबोल केला. बीड येथील दौऱ्यात राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी असल्याचे समोर आले होते. राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपार्‍या फेकल्या ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.