AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला पुरोगामीत्व शिकवू नका, माझा जन्म…”, गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया

आता याप्रकरणी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. याप्रकरणी आता एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मला पुरोगामीत्व शिकवू नका, माझा जन्म..., गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jul 15, 2024 | 3:38 PM
Share

Vishalgarh Encroachment Case : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांवर दगडफेक केली. तसेच त्या परिसरात असलेल्या वाहनांची जाळपोळही करण्यात आली. आता याप्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीराजेंसह ५०० जणांवर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याचे रवींद्र पडवळ याच्या नेतृत्वाखाली आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर आणि विशाळगडाच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. मात्र या आंदोलनाला गालबोट लागले आणि दगडफेक, जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आता याप्रकरणी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. याप्रकरणी आता एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

500 जणांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यासोबतच माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जिल्ह्याचा स्थानिक नेता, पालकमंत्री मला पुरोगामीत्व शिकवतो. संभाजीराजे म्हणून मला कोट करतो, माझा त्यांना प्रश्न आहे की दीड वर्ष हा विषय न्यायप्रविष्ठ नाही. पण तुम्हाला हा विषय न्यायप्रविष्ठ आहे, हे कोणी सांगितलं. मग आज त्या गोष्टीला परवानगी कशी मिळाली, जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून त्यांनी ती परवानगी देऊन टाकली का? पालकमंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलून चालत नाही तेही मला कोट करुन. तुम्ही जे पूरोगामीत्व म्हणता, शाहू महाराजांचे पूरोगामीत्व मला शिकवू नका, माझा जन्म त्यांच्या घराण्यात झाला आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी दिली.

काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा. जय शिवराय ! असे ट्वीटही संभाजी राजे छत्रपती यांनी केले.

नेमकं प्रकरण काय?

विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी रविवारी १४ जुलैला पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन झाली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांवर दगडफेक केली. तसेच त्या परिसरात असलेल्या वाहनांची जाळपोळही करण्यात आली. या प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.