यंत्रणा अ‍ॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड हे पोहरादेवीतून निघाले आहेत. (sanjay rathod will reach poharadevi soon with family)

  • अक्षय कुडकेलवार, गजानन उमाटे, दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 11:28 AM, 23 Feb 2021
यंत्रणा अ‍ॅलर्ट! संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत; पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

यवतमाळ: शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड हे पोहरादेवीतून निघाले आहेत. ते कोणत्याहीक्षणी पोहरादेवीत पोहोचणार आहे. राठोड येणार असल्यामुळे पोहरादेवीत त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली असून त्यांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य वाजवून जल्लोष केला जात आहे. त्यामुळे पोहरादेवीत जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. (sanjay rathod will reach poharadevi soon with family)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर तब्बल 15 दिवसानंतर संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत दर्शनासाठी येत आहेत. राठोड पोहरादेवीला येणार असल्याने या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी होम हवनही करण्यात येत आहे.

पारंपारिक वेषात, ढोलताशांचा गजर

या ठिकाणी अनेक राठोड समर्थक पारंपारिक वेषात आले आहेत. काहींनी तर पारंपारिक वेषात ढोलताशे वाजवून गाणे गात राठो यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पोहरादेवी परिसरात लोक वाद्य वाजवून नाचत आहेत. बंजारा भाषेतील लोकगीतंही म्हटलं जात आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी आम्ही आलो आहे. त्यांना पूजा चव्हाण प्रकरणात बदनाम केलं जात आहे, असं राठोड समर्थकांचं म्हणणं आहे. संजय राठोड आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाही यावेळी दिल्या जात आहे.

240 पोलिसांचा बंदोबस्त

पोहरादेवी येथे राठोड यांचं भाषण होण्याची शक्यता आहे. या परिसरात स्टेज बांधण्यात आला आहे. प्रशासनाने पोहरादेवी संस्थेला केवळ 50 लोकांची परवानगी दिली असली तरी या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे या परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. गर्दी अधिक वाढू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी 240 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून राज्य राखीव दलाचे पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. (sanjay rathod will reach poharadevi soon with family)

 

संबंधित बातम्या:

संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीकडे रवाना; शिवसेना नेतेही सोबत

PHOTO: संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन? पोहरागडावर ठिकठिकाणी पोस्टर्स

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(sanjay rathod will reach poharadevi soon with family)