PHOTO: संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन? पोहरागडावर ठिकठिकाणी पोस्टर्स

पोहरादेवी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केले आहेत. 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात केले आहेत. तसंच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. | Sanjay Rathod in Poharadevi

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, वाशिम
  • Published On - 10:42 AM, 23 Feb 2021
1/9
Sanjay Rathod in Poharadevi
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) संकटात सापडलेले सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) आज पोहरादेवी (pohradevi) मंदिरात दर्शनाला जाणार आहेत.
2/9
Sanjay Rathod in Poharadevi
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. पोहोरादेवी हे एक धार्मिक स्थळ आहे. धर्मपीठ आहे. येथून आम्ही समाजाला संदेश देतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. चांगल्या रितीरिवाज रुढी परंपरेविषयी प्रथेविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. संत सेवालाल महाराजांना देशभरातील 12 कोटी जनता मानते.
3/9
Sanjay Rathod in Poharadevi
संजय राठोड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी गडावर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
4/9
Sanjay Rathod in Poharadevi
अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून अनेक ठिकाणी संजय राठोड यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेआहेत.
5/9
Sanjay Rathod in Poharadevi
हे सर्व बॅनर्स पाहता बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे दिसत आहे. संजय राठोड यांच्या आगमनावेळी 15 ते 20 हजार लोकांची गर्दी जमण्याची शक्यता आहे.
6/9
Sanjay Rathod in Poharadevi
संजय राठोड यांच्या पोहरादेवील दौऱ्यासाठी पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोहरादेवी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केले आहेत. 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात केले आहेत.
7/9
Sanjay Rathod in Poharadevi
संजय राठोड यांच्या दौऱ्यासाठी पोहरादेवीत बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्क्वाडही दाखल झाले आहे.
8/9
Sanjay Rathod in Poharadevi
संजय राठोड येण्यापूर्वी बॉम्बशोधक पथकाकडून पोहरादेवी मंदिराचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.
9/9
Sanjay Rathod in Poharadevi
पोहरादेवी येथे सध्या 200 पोलीस कर्मचारी आणि ४० अधिकारीतैनात आहेत. तसंच पोहोरादेवीच्या चारंही बाजूनं बॅरिकेटिंग केलं गेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोहोरादेवीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षक अनिल ठाकरेंनी दिली आहे.