AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : बारामती पोटनिवडणुकीवरून राऊतांच्या शरद पवार गटाला कानपिचक्या? म्हणाले, इतर कोणी…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक चर्चेत आहे. शरद पवार गटाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत मतभेद दिसू लागले आहेत. संजय राऊत यांनी शरद पवार गटाला कानपिचक्या देत, इतर कोणी निवडणूक लढवल्यास विरोध करू नये असे सूचित केले. यामुळे आघाडीत बारामतीवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : बारामती पोटनिवडणुकीवरून राऊतांच्या शरद पवार गटाला कानपिचक्या? म्हणाले, इतर कोणी...
Sanjay Raut
| Updated on: Apr 03, 2026 | 1:25 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाकडे आहे. मात्र पवार गटाने निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याला ठाकरे गटानेही समर्थन दिलं आहे. या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार गटाला कानपिचक्याही दिल्या आहेत. त्यामुळे आघाडीत बारामतीवरून वाद असल्याचं स्पष्ट होत आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. महाविकास आघाडी म्हणून दोन्ही निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बारामतीच्या जागेवर शरद पवार गटाचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा होईल. या जागेबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे बारामती विधानसभेची निडवणूक होत आहे. कौटुंबिक धर्म म्हणून शरद पवारांचा पक्ष कदाचित ही निवडणूक लढणार नाही. इतर लढतील तर त्यांना विरोधी करता कामा नये. कारण शेवटी लोकशाही आहे. एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

मंत्र्यांच्या संवेदना ठार

मी संघटनात्मक बांधणीसाठी जळगावात आलो आहे. लोकसभेसाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली आहे. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. मात्र कोणीही मंत्री, नेता त्यावर बोलताना दिसत नाही. जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पालकमंत्री अथवा सरकारकडून शेतकऱ्यांपर्यंत संवेदना व्यक्त केली जात नाहीये. आमदार, मंत्र्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली गेली पाहिजे. पण या मदतीसाठी आमदार आणि मंत्री पावले उचलताना दिसत नाहीये. हे सरकार असंवेदनशील आहे. सरकारमधील मंत्र्यांच्या संवेदना ठार झालेल्या आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

कुठे आहेत संकटमोचक?

कुठे आहेत गिरीश महाजन? ज्यांना संकट मोचक म्हणतात ना? शेतकऱ्यांच्या संकटावेळी हे संकटमोचक कुठे असतात? ते फक्त राजकीय संकटमोचक आहेत का? शेतकऱ्यांवर संकट येतात तेव्हा हे संकटमोचक काय करताना दिसत नाही. फक्त आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे, पक्ष फोडणे, हेच फक्त संकटमोचकाचे कर्तव्य आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

तेव्हा आम्ही बोलू

लेखिका अरुणा साबणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोंदू खरात बाबत पत्र लिहिलं आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी या प्रकरणांमध्ये चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे. कोणाला दोषी ठरवायचं आणि कोणाला नाही हे एसआयटी तसेच गृहखातं आणि नाशिकचा पोलीस ठरवतील ठरवेल. या प्रकरणात संपूर्ण तपास पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल होईल त्यावेळी आम्ही बोलू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणाला वाचवला हे कोणाला दोष ठरवून आहे हे आताच्या क्षणाला बोलणं उचित ठरणार नाही.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय