AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते – संजय राऊत

औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्याने वागला हे दाखवण्यात आलं. त्याच संभाजी महाराजांच्या राज्यात तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुख सारख्या एका प्रजेच्या, नागरिकाच्या बाबतीत दिसला, त्याच क्रौर्याने संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा, हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला असा आरोप संजय राऊतांनी केला.

तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते - संजय राऊत
संजय राऊत Image Credit source: TV9
| Updated on: Mar 04, 2025 | 1:09 PM
Share

इतक्या गोष्टी समोर आल्या , संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे मारण्यात आलं. नंतर त्यांच्यावर लघवी करण्यात आली, किती पराकोटीचं क्रौर्य या महाराष्ट्रात , बीडमध्ये जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत. हे सर्व लोक मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. मुंडे हे काही कोणी महात्मा नाहीत, हे मि. फडणवीसांनाही माहीत आहे, अजितदादांनाही माहित आहे. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या, दहशत, दाखवून कसं मतदान करू दिलं नाही हे निवडणूक आयोगाने, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी देखील पाहिलं आहे. त्यांची निवडणूक त्याचवेळी रद्द व्हायला हवी होती, तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

औरंगजेबाइतकाच क्रौर्य संतोष देशमुखांच्या हत्येवेळी दिसलं

पण आज पोलिसांनी जे पुरावे, व्हिडीओ, फोटो समोर आणले ते पाहून महाराष्ट्र किती क्रूर झाला झाला आहे, हे दिसतंय. एका बाजूला छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर हे दाखवता, औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रौर्याने वागला हे दाखवण्यात आलं. त्याच संभाजी महाराजांच्या राज्यात तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुख सारख्या एका प्रजेच्या, नागरिकाच्या बाबतीत दिसला, त्याच क्रौर्याने संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा, हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला असा आरोप संजय राऊतांनी केला.

या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पुढल्या 24 तासांतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण ते म्हणतात कोर्ट ठरवेल. नैतिकतेच्या मुद्यावर हा राजीनामा त्यांनी घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छातीठोकपणे सांगता आलं असतं असा राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री हे कायदा, न्यायाची बूज राखत नाहीत

या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत. मुख्यमंत्री हे कायदा आणि न्याय यांची बूज राखत नाहीत. काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, त्याला न्याय म्हणत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्यांनी ताबडतोब मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्त दाखवायला हवा , जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेर काढायला पाहिजे आणि या राज्यात इतर कोणीही कायद्याचा गैरवापर करू नये, याचीसुद्धा त्यांनी काळजी घ्यायला हवी असं राऊत यांनी सुनावलं.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.