
Laxman Hake criticized BJP: ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सध्या भाजपवर टीका करताना दिसत आहेत. त्यांच्या या नाराजीची सध्या चर्चा सुरू आहे. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. आतापर्यंत महाविकास आघाडी, शरद पवार, अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेणारे हाके आता भाजपवर ही तुटून पडले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी महापालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविषयी सुद्धा मोठे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले लक्ष्मण हाके?
भाजप भयग्रस्त पार्टी
भारतीय जनता पार्टीने आपली घोषणा बदलावी काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजपा अशी करावी असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला आहे.आता भाजपाचा DNA भाजपामध्ये नाही.भयग्रस्त पार्टी म्हणून भाजपाची ओळख झाली आहे. अनेक पक्षातील आयात उमेदवार घेतल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. सर्वात घाबरलेली पार्टी म्हणून भाजपाची ओळख निर्माण झाल्याचा टोला हाके यांनी लगावला. तर जे लोक महानगरपालिकेमध्ये बिनविरोध झाले आहेत त्यांनी असं काय काम केलं आहे ते बिनविरोध झाले त्यांचे कॅरेक्टर तपासून पहावेत, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. भाजप म्हणते ओबीसी आमचा डीएनए, कुठे आहे असा सवाल त्यांनी केला.
अजितदादांसह मोहोळांवरही टीका
मोहोळ काय आणि अजित दादा काय एका नाण्याच्या दोन बाजू फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि पाहुणे रावळ्यांचा राजकारण करायचं असा आरोप हाके यांनी केला आहे. अजित पवारांची नीती म्हणजे काकांची नीती आहे. ते गुंडांचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर पवारांचे दात तोंडात नाहीतर पोटात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवार आणि अजित पवार पहिल्यापासून एकच होते. मताला आम्ही आणि लाभ घ्यायचे वेळ आली की कुटुंब म्हणन एकत्र येतात. एका बाजूला मराठा कुणबीचे तिकीट दिलं की दुसरा सुद्धा तेच करतो. कोणाच्या जागेवर तर ओबीसी च्या जागेवर हे तिकीट देण्यात येतं असा आरोप त्यांनी केला.