AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप होणार? मोठी बातमी समोर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला आता आणखी एक धक्का बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्यानं फडणवीस यांची भेट घेतली आहे.

शिवसेना ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप होणार? मोठी बातमी समोर
| Updated on: Jun 02, 2025 | 7:47 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीने राज्यात 232 जागांवर विजय मिळवला, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला, तीनही घटक पक्ष मिळून महायुतीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं.  विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसाठी पक्षाला लागलेली गळती डोकेदुखीचा विषय ठरली आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.  याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. फडणवीसांना  निवेदन देण्यासाठी भेटल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं, मात्र दुसरीकडे ठाकरेंसोबत कोण राहणार? कोण जाणार? असं सूचक विधान या भेटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले बडगुजर? 

माननीय मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले आहेत, मी कालपासून त्यांच्याकडे वेळ मागतिली होती, की मला एक पाच मिनिटांचा वेळ मिळावा, त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार आज सकाळी मी त्यांना भेटोलो. मी त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, असं बडगुजर यांनी म्हटलं आहे.

महाजन यांची प्रतिक्रिया 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. ते नाशिकला आले संघटत्माक गोष्टींवर चर्चा करून गेले. आता तुम्ही बघा या आठ दिवसांमध्ये त्यांच्याकडे कोण राहील आणि कोण जाईल ते? या मणसाच्या बडबडीमुळे यांच्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वत:  उद्धवजीही परेशान असतील, सध्या ते आऊट ऑफ कंट्रोल झालेले आहेत, असं म्हणत, गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

Follow Us
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर.
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट.
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?.
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,.
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे.....
शिवाजी कोण होता? पुस्तकावर नवा वाद; बनावट प्रतींवर पानसरे......
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या...
ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या....
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...