‘मी कस्टडीत जाईन, पण…’, राजन साळवींनी दंड थोपटले, ACB च्या कारवाईवर मोठं वक्तव्य

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात एसीबीकडून छोपेमारी करण्यात आली आहे. एसीबीकडून आज सकाळीच साळवी यांच्या घरी छापा टाकण्यात आला. साळवी यांच्या घरी एसीबीच्या पथकाकडून आज सकाळी आठ वाजेपासून झाडाझडती सुरु आहे. एसीबीच्या छाप्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते साळवी यांच्या घराच्या बाहेर जमले आहेत. यावेळी साळवी देखील कार्यकर्त्यांना भेट देत आहेत. साळवी यांनी यावेळी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली.

'मी कस्टडीत जाईन, पण...', राजन साळवींनी दंड थोपटले, ACB च्या कारवाईवर मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 5:19 PM

मनोज लेले, रत्नागिरी | 18 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन साळवी यांनी साडेतीन कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आलाय. राजन साळवी यांच्याविरोधात आज सकाळपासून एसीबीची छापेमारी सुरु आहे. एसीबीने आज सकाळी राजन साळवी यांच्या घरी, त्यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेलवर धाड टाकली. त्यानंतर त्यांच्याविरोधात बेनामी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसीबीकडून गेल्या 8 तासांपासून राजन साळवी यांच्या घरी झाडाझडती सुरु आहे. असं असलं तरी राजन साळवी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस कस्टडीत राहण्याची माझी तयारी आहे, असं राजन साळवी म्हणाले आहेत.

राजन साळवी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आतापर्यंत माझ्या चार ठिकाणच्या प्रॉपर्टीचं मोजमाप झालेलं आहे. आता माझ्या मूळ घरात अधिकाऱ्यांची टीम आहे. त्यांच्याकडून झाडाझडती सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होईल, असं वाटतं. पण मला ठोस माहिती नाही. पण त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी, माझी पत्नी आणि माझ्या मुलावर गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे”, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.

‘उद्धव ठाकरेंनी फोन करुन विचारपूस केली’

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आमच्यावर ज्या-ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळी ते कुटुंबप्रमुख म्हणून पाठिशी उभे असतात. त्यांनी आज सकाळपासून दोनवेळा मोबाईलवर फोन करुन विचारपूस केली आहे. त्यांनी मला ठामपणे सांगितलं आहे की, राजन घाबरायचं कारण नाही. आम्ही तुझ्यापाठिशी शिवसेना आणि ठाकरे कुटुंब म्हणून खंबीरपणे उभे आहोत”, असं राजन साळवी यांनी सांगितलं.

‘माझा छापेमारीबद्दलच आक्षेप’

“माझा छापेमारीबद्दलच आक्षेप आहे. छापेमारी करायला मी गुंड आहे का? ही चौकशी आहे. मी सामोरं जातोय. जे व्हायचं ते होईल. ते त्यांची कायदेशीर कारवाई करणार आहेत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. माझे सहकारी जामीनासाठी न्यायालयात अर्ज करतील. मला न्यायालयात निश्चित न्याय मिळेल. मला ताबोडतोब जामीन मिळेल, असं वाटतं”, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.