वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा समीर वानखेडे यांना पाठिंबा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे. मी वानखेडे यांना कधीच भेटले नाही. पण त्यांच्याबद्दल बऱ्याच सरकारी अधिकारी आणि पत्रकारांकडून आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्याविरोधात जे बदनामीसत्र चालवलं आहे ते एकदम चीड आणणारं आहे, असे दामानिया म्हणाल्या आहेत.

वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा समीर वानखेडे यांना पाठिंबा
ANJALI DAMANIA SAMEER WANKHEDE
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 5:52 PM

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मंत्री नवाब मिलक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी धर्मांतर लपवून ठेवलं असा आरोप केला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे. मी वानखेडे यांना कधीच भेटले नाही. पण त्यांच्याबद्दल बऱ्याच सरकारी अधिकारी आणि पत्रकारांकडून आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्याविरोधात जे बदनामीसत्र चालवलं आहे ते एकदम चीड आणणारं आहे, असे दामानिया म्हणाल्या आहेत.

वानखेडे यांची विश्वासर्हता कमी करण्यासाठी खटाटोप

समीर वानखेडे यांना मी कधीही भेटले नाही. पण त्यांच्याबद्दल ऐकलं आहे. वानखेडे यांचं काम हे सरळ आणि स्पष्ट असल्यांच ऐकलंय. मलिक यांच्याकडून वानखेडे यांची प्रतिमा आणि विश्वासर्हता कमी करण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अशा वेळी समीर वानखेडे यांच्या बाजूनं सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांनी उभं राहायला हवं. आज जर त्यांच्यासोबत कुणी उभं राहिलं नाही तर तुम्हीदेखील तुमचं कर्तव्य व्यवस्थित पाडू शकणार नाहीत,” असे मत दमानिया यांनी व्यक्त केलं.

मिडीयात माझ्याविरोधातही बातम्या प्लांट केल्या गेल्या

तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात लढताना मला स्वता:लाही असाच सगळा त्रास देण्यात आला होता. मिडीयात दररोज माझ्याविरोधात बातम्या प्लांट केल्या गेल्या. यामध्ये आदिवासी लोकांची जमीन खरेदी केली हे खोटं पसरवण्यात आलं. पण माझ्याविरोधात एकाही आरोपात तथ्य आढळलं नाही. आता समीर वानखेडेंबद्दल मला नेमकं हेच जाणवत आहे,” असे दमानिया म्हणाल्या.

वानखेडे आणि एनसीबीच्या पाठीशी उभं रहायला हवं

याच नवाब मलिक यांनी माझ्यावरदेखील दररोज खोटे आरोप केले होते. पण त्यातून काहीच सिद्ध झालं नाही. आता हेच नवाब मलिक स्वत:च्या जायवाच्या अटकेबद्दल वैयक्तिक स्कोर सेटल करत आहेत. या सगळ्या कटकारस्थानाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वानखेडे आणि एनसीबीच्या पाठीशी उभं रहावं, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

इतर बातम्या :

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला

Aryan Khan Bail Granted: आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, उद्या तुरुंगाबाहेर येणार?

(social worker anjali damania criticizes nawab malik appeals citizens to support sameer wankhede)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.