Aryan Khan Bail Granted: आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, उद्या तुरुंगाबाहेर येणार?

गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे आर्यन खान आजच तुरुंगातून बाहेर येणार आहे. (Aryan Khan bail granted latest news Bombay High Court)

Aryan Khan Bail Granted: आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, उद्या तुरुंगाबाहेर येणार?
Aryan Khan

मुंबई: गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.

आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

उद्या किंवा बाहेर कोर्टाबाहेर येणार

आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं.

अटी काय?

साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

युक्तिवाद काय?

स्माॉल कॉन्टिटी, कट नव्हता आणि अशा प्रकरणात एका वर्षाची शिक्षा असते. तसेच या प्रकरणात जामीन दिला जात असल्याचं आम्ही कोर्टाला सांगितलं. त्यामुळे कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. यात कोणताही कट नव्हता. तसेच आर्यन आणि अरबाज जहाजावरील कुणालाही ओळखत नव्हते. त्यामुळे या प्रकरणात कट होता असं म्हणता येणार नाही, असंही आर्यनच्या वकिलांनी सांगितलं.

 

समीर वानखेडेंचे नो कमेंट

दरम्यान, आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी मीडियाने गराडा घातला. एनसीबीला हा मोठा सेटबॅक आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यावर वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नो कमेंट एवढंच म्हणून ते निघून गेले.

 

संबंधित बातम्या: 

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

Maharashtra News LIVE Updates | मोठी बातमी ! आर्यन खानला अखेर जामीन

आधी भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आता पाळीव बैलाचा बापलेकावर हल्ला, आठवड्याभरात दोन आधार हरपले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI