AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजीकडून सतत मदतीसाठी हाक, नात वैतागली अन् नंतर जे घडलं… संपूर्ण महाराष्ट्र संतप्त

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील विहाळ येथे आजारी आजीची नातीने भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आजीकडून सतत मदतीसाठी हाक, नात वैतागली अन् नंतर जे घडलं... संपूर्ण महाराष्ट्र संतप्त
crime
| Updated on: Apr 16, 2026 | 8:38 AM
Share

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात विहाळ गावात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अर्धांगवायूने (पॅरालिसिस) आजारी असलेल्या ८२ वर्षीय आजीची तिच्याच नातीने क्षुल्लक कारणाने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु पोलिसांच्या कौशल्यामुळे खरा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपी नातीला बेड्या ठोकल्या आहेत. जनाबाई भगवान सुरवसे असे मृत आजीचे नाव आहे, तर मनिषा रविंद्र लवंगारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नातीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

जनाबाई भगवान सुरवसे या वृद्ध महिला अर्धांगवायू आजाराने त्रस्त होत्या. आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. आजारपणामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्या वारंवार तक्रार करत असत. तसेच मदतीसाठी आवाज देत असत. शनिवारी ११ एप्रिलला रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास याच कारणावरून मनिषा आणि जनाबाई यांच्यात वाद झाला.

आधी मनिषाने आजीला अश्लील शिवीगाळ केली. तू वारंवार किरकिर का करते? असे सांगत तिने त्यानंतर अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिने आजीचे डोके धरून भिंतीमधील दगडावर जोरात आपटले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे जनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद अशी करण्यात आली होती. मात्र, संशय बळावल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार अजहर शेख, दीपक घोरपडे आणि किरण पाटील यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. यावेळी शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष आणि तपासात मिळालेले पुरावे यात विसंगती आढळून आली. त्यानंतर मग पोलिसांनी आरोपी मनिषा लवंगारे हिची कसून चौकशी केली. पोलिसांच्या उलट तपासणीवर मनिषाचा टिकाव लागला नाही. तिने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीवर कायदेशीर कारवाई

या प्रकरणी हवालदार दिपक हरिश्चंद्र घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनिषा लवंगारे हिच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १०३ (१) खून, कलम ११५ (२) स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे, कलम ३५२ शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे, या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Follow Us
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर