AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

106 वा आमदार द्या, करेक्ट कार्यक्रम करतो, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले होते

पांडुरंगाची इच्छा होती. हे पैसे आमच्याच हातून दिले गेले पाहिजे होते.

106 वा आमदार द्या, करेक्ट कार्यक्रम करतो, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले होते
देवेंद्र फडणवीस असं का म्हणालेतImage Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 04, 2022 | 3:08 PM
Share

सोलापूर : सोलापूरच्या मंगळवेढ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले, 65 मिलीमीटरची अट आपण शिथील करू. ती मदतदेखील करायला सुरुवात केली. मदत करताना एनडीआरएफच्या दुप्पट मदत आपण करतोय. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे.

मागच्या सरकारनं अडीच वर्षांपूर्वी घोषणा केली होती. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला आपण 50 हजार रुपये कर्ज देऊ. घोषणा केली विसरून गेले. आपल्या इथं एक म्हण आहे. मी कोणाला लबाड वैगेरे म्हणत नाही. पण, म्हण आहे. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. ती अवस्था होती, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.

कमीतकमी पाच विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही विचारायचो. 50 हजार रुपयांची शेतकऱ्यांसाठी घोषणा केली. कधी देणार. कुठही गेलं की, शेतकरी विचारतात. आम्हाचा हेच आश्वासन मिळायचं. बस आता पुढच्या अधिवेशनात देऊ.

शेवटपर्यतं त्यांनी काही दिलं नाही. पांडुरंगाची इच्छा होती. हे पैसे आमच्याच हातून दिले गेले पाहिजे होते. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही निर्णय केला. एका क्लिकने सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले असल्याची फडणवीस यांनी माहिती दिली.

१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे गेले. आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे. हे सर्व करत असताना मागच्या काळात गुजरातच्या राज्यपालांना पुण्याला बोलावलं. सुमारे दहा हजार शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम केला.

नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण दिले. खतांचे भाव वाढले आहेत. औषधांचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचं ते म्हणाले.

106 वा आमदार द्या, करेक्ट कार्यक्रम करतो, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले होते.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट