AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : त्या अहवालाने अजितदादांच्या अडचणीत वाढ, कुर्डू मुरूम प्रकरणात प्रशासनाचा मोठा खुलासा

Kurdu Murum case : कुर्डू येथील मुरूम प्रकरणात प्रशासनाच्या नवीन खुलाशानं अजितदादा पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजितदादा वादात सापडले होते.

Ajit Pawar : त्या अहवालाने अजितदादांच्या अडचणीत वाढ, कुर्डू मुरूम प्रकरणात प्रशासनाचा मोठा खुलासा
अजित पवार, अंजना कृष्णा
| Updated on: Sep 12, 2025 | 12:26 PM
Share

IPS Anjana Krushana-DCM Ajit Pawar : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील मुरूम प्रकरणात अजितदादांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कुर्डू मुरूम उत्खनन प्रकरणाचा अहवाल माढा तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. तो अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. त्यामुळे अजितदादांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाईपासून रोखण्यासाठी केलेल्या कॉलमुळे अजितदादा वादात सापडले होते. त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. तर त्यांच्या बचावासाठी विरोधी बाकावरील आमदार रोहित पवार समोर आल्याचे दिसून आले होते. आता या अहवालाने पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.

कुर्डूतील मुरूम उत्खनन बेकायदेशीरच

कुर्डूतील मुरूम उत्खनन हे बेकायदेशीरच असल्याचा ठपका माढाच्या तहसीलदाराने पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. कुर्डू येथील गट क्रमांक 575-1 मध्ये 120 ब्रासचा मुरूम अवैधरित्या उत्खन्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना हा अहवाल पाठवला आहे. दादाराव माने यांच्या शेतातून हा मुरूम उत्खनन करण्यात आला आहे. उत्खनन केलेला मुरूम हा शिराळ कुर्डू अंबड येथील पाणंद रस्त्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणात 2024 साली आदेश देण्यात आले होते. पण त्याला मुदतवाढ देण्यात आली नव्हती. मुरूम उत्खनन गटातून बेकायदेशीररित्या हा मुरूम उत्खनन केल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवाल प्राप्त झाला

कुर्डू मुरूम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. कुर्डूमध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या ठिकाणी जी काम मंजूर झाली होती त्याची मुदत संपलेली होती तसेच उत्खनन करण्यासाठी कोणतेही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग आहे त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये जी वस्तुस्थिती आहे ती समोर आलीय. ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. समन्वयाने पुढे गेले पाहिजे. गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत, असे गोरे म्हणाले. दरम्यान आज गावकऱ्यांना बंद पुकारण्याचा निर्णय जाहीर केला होता.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.