सोलापुरातील राजकीय समीकरण बदलली…; अजित पवार गटाचा मोहिते पाटलांना मोठा धक्का

Babanrao Shinde in Shivsena Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. सोलापुरातील मोहिते गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सोलापुरातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. वाचा सविस्तर...

सोलापुरातील राजकीय समीकरण बदलली...; अजित पवार गटाचा मोहिते पाटलांना मोठा धक्का
अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 9:53 AM

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील राजकीय समिकरणं बदलू लागली आहेत. सोलापूरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरातील माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटलांना मोठा धक्का दिला आहे. मोहिते पाटलांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतानाच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देखील दर्शवला आहे.

कुणी केला अजित पवार गटात प्रवेश?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटील गटाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी त्यांच्या समर्थकासह माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांना समर्थन दिलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बबनराव शिंदे यांना मिळणारं समर्थन वाढलं आहे.

प्रकाश नवगिरे यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांचा कार्यकर्त्यांशी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणारा नेता बबनराव शिंदे यांच्या गळाला लागला आहे. मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात नगरपंचायतमध्ये आमदार बबनराव शिंदे गटाची नगरसेवक संख्या नगराध्यक्षांसह 8 इतकी झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. महाळुंग श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Babanrao Shinde in Shivsena Eknath Shinde

बबनराव शिंदेंचा मोहिते पाटलांना धक्का

सोलापूरची राजकीय समिकरणं

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच आमदार बबनराव शिंदे यांनी पुण्यातील मोदी बागेत जात महिनाभरापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यामुळे ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बबनराव शिंदे हे त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच बबनराव शिंदे आपल्या समर्थकांची संख्या वाढवताना दिसत आहेत. महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी त्यांच्या समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिलाय.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....