Palghar Corona : कोरोनाचा कहर, पालघर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, ‘हे’ 9 नियम बंधनकारक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:10 PM, 6 Apr 2021
Palghar Corona : कोरोनाचा कहर, पालघर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, 'हे' 9 नियम बंधनकारक

पालघर : राज्यभरात कोरोना संसर्गाने कहर केलाय. त्यामुळेच महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. मात्र, पालघरमध्ये वाढत्या कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडील 4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पालघरमध्ये 5 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात कडक निर्बंध लावण्यात आलेत (Strict restriction in Palghar district amid Corona know all about rules).

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी होणार?

1. ऑटोरिक्षा : चालक + 2 प्रवासी क्षमतेने प्रवास करता येईल.

2. टॅक्सी : वाहन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने प्रवास करता येईल.

3. बस : पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करता येईल. पंरतु उभे राहून प्रवास करता येणार नाही.

4. वाहनातील सर्व प्रवासांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.

5. एकाही प्रवासाने मास्क न घातल्यास चालकास दंड आकारण्यात येईल.

6. प्रत्येक खेपेनंतर वाहन निर्जंतुकीकरण (sanitized) करणे बंधनकारक आहे.

7. जिल्हयातील सीमा तपासणी नाका येथून जिल्हयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे चालक, वाहक व इतर कर्मचारी यांची 10 एप्रिल 2021 पासून RTPCR चाचणी निगेटीव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक असेल अन्यथा 1000 रुपये दंड आकारण्यात येईल.

8. ऑटोरिक्षा व टॅक्सीचे वाहन चालकाने प्लॅस्टीक आवरण घातले असल्यास RTPCR चाचणी निगेटीव्ह अहवाल सोबत असणे पासून अपवाद करता येईल.

9. खासगी वाहतूक सोमवार ते शुक्रवार या वारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहील. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

पालघरचे 180 वऱ्हाडी डेस्टिनेशन वेडिंगसाठी विमानाने राजस्थानला, तिघांना कोरोना झाल्यानं यंत्रणा अलर्ट

पालघरच्या आश्रमशाळेत कोरोनाचा स्फोट, 48 विद्यार्थ्यांपाठोपाठ 19 कर्मचारीही बाधित

पालघरला कोरोनाचा विळखा, आश्रमशाळेतील 37 विद्यार्थ्यांना लागण

व्हिडीओ पाहा :

Strict restriction in Palghar district amid Corona know all about rules