AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंविरोधात संताप, गाडी अडवून घोषणाबाजी

मनोज जरांगे सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे रा्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र वेगळेच चित्र निर्माण झाले. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

मोठी बातमी! मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंविरोधात संताप, गाडी अडवून घोषणाबाजी
supriya sule
| Updated on: Aug 31, 2025 | 4:06 PM
Share

Supriya Sule At Azad Maidan : मनोज जरांगे सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे  सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र वेगळेच चित्र निर्माण झाले. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

सुप्रिया सुळेंना अडवलं, पवारांविरोधात घोषणाबाजी

सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून त्यांच्या कारकडे निघाल्या होत्या. मात्र मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी तर खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. या सर्व स्थितीमुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवलं.

पुढे कार अडवली, जोरदार घोषणाबाजी

मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर सुप्रिया सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला. तसेच प्रत्येकाच्या हातात ता मिळवला. सर्वांनाच नमस्कार करून त्या नंतर कारमधून निघून गेल्या. नंतर आंदोलकांनी त्यांच्या कारचाही पाठलाग केला. त्यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडीमुळे सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण काही आंदोलकांनी भान राखून सुळे यांच्या कारला वाट करून दिली.

जरांगे यांचे शांत राहण्याचे आवाहन

दरम्यान, मनोज जरांगे वारंवार मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहेत. काहीही झालं तरी तुम्ही आक्रमक होऊ नका. शांत राहा. आपल्याला शांततेत आरक्षण घ्यायचे आहे, असे जरांगे आंदोलकांना सांगत आहेत. मात्र काही आंदोलक आक्रमक होताना दिसत असून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा