उंचावरुन खाली कोसळला, बांबू आरपार घुसला, पण म्हणतात देव तारी त्याला कोण मारी, डॉक्टर बनले देवदूत !

निर्माणाधीन इमारतीवर रोजंदारीवर मजुरीचे काम करणारा एक कामगार उंचावरुन खाली पडला. यावेळी बांबूही त्याच्या शरीरातून आरपार केला. पण काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.

उंचावरुन खाली कोसळला, बांबू आरपार घुसला, पण म्हणतात देव तारी त्याला कोण मारी, डॉक्टर बनले देवदूत !
कल्याणमध्ये जखमी कामगारासाठी डॉक्टर देवदूत बनलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 7:28 AM

कल्याण : आपल्याकडे डॉक्टरांना देव किंवा देवदूत असे म्हटले जाते. या शब्दांचा जिवंत अनुभव कल्याणात एका गरीब कामगाराला आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या कामगाराला कल्याणच्या आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने तब्बल 9 तास शर्थीचे प्रयत्न करत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. सामाजिक जाणिवेतून हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि प्रशासनाने केलेल्या या कामगिरीचे कल्याणकरांकडून कौतुक होत आहे.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. कामगाराचा अपघात इतका भीषण होता की, रुग्णाचे प्राण वाचणे मुश्कील होते. मात्र डॉक्टर देवदूत बनले अन् रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून परत घेऊन आले.

दीड महिन्यांपूर्वी झाला होता अपघात

इमारत बांधकाम क्षेत्रात नेहमी अपघात घडत असतात. असाच एक अंगावर काटा आणणारा अपघात कल्याणमध्ये दीड महिन्यांपूर्वी घडला होता. एका इमारतीच्या बांधकाम ठिकाणी एक मोठी घटना घडली. या घटनेत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा अतिशय गंभीर अपघात झाला होता. इमारतीचे काम सुरू असताना कामगार उंचीवरून खाली कोसळला. मात्र टोकदार बांबू त्याच्या उजव्या कुशीतून लिव्हर, किडनी, आतडे आणि फुफ्फुसाला छेदून आरपार बाहेर निघाला. त्यावेळी इतर कामगार आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाने क्षणाचाही विलंब न करता या कामगाराला जवळच्याच आयुष हॉस्पिटलमध्ये नेले.

तब्बल 9 तास शस्त्रक्रिया करुन रुग्णाला जीवदान

रुग्णालयात आणले त्यावेळी त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरु केले. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवत तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रियाही केली. तब्बल 9 तास ही शस्त्रक्रिया करत या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. तर शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ज्याठिकाणी अतिदक्षता विभागाततील आयसीयू टीमने प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा करत या कामगाराला नविन जीवदान दिले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.