AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांसमोरच एकनाथ शिंदे- रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली; वाचा आरोप-प्रत्यारोप काय?

डोंबिवलीतील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात आज मानापमान नाट्य पाहायला मिळालं. तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. (eknath shinde)

मुख्यमंत्र्यांसमोरच एकनाथ शिंदे- रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली; वाचा आरोप-प्रत्यारोप काय?
eknath shinde
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 4:40 PM
Share

डोंबिवली: डोंबिवलीतील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात आज मानापमान नाट्य पाहायला मिळालं. तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातील शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. कल्याण-डोंबिवली शहराशी आपलं विशेष नातं आहे. त्यामुळे या शहरासाठी 472 कोटी रुपयांचा निधी द्या. तसे आदेशच एकनाथ शिंदे साहेबांनी द्या, असं रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. फक्त 472 कोटींवर अडून बसू नका. एकाच भागासाठी सर्व निधी खर्च करता येणार नाही. सर्वसमावेशक काम करावं लागेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. (eknath shinde taunt ravindra chavan over development fund)

डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबूगिरीचा प्रचंड राग आहे. लोकांच्या घरची भांडी घासू नका. आमचा त्यालाही पाठींबा होता. हे सर्व बाबू पुन्हा तेच करत आहेत. काही अधिकारी कशा पद्धतीने वागत आहेत. आपण तसे करणार नाही. गाय वासरू मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठशी खंबीरपणे उभे राहू नका. आपण हिंदुत्वाचा धागा पकडून चाललोय. तुमच्या आमच्या मनात असणारे हिंदुत्व कायम आहे. राज्यात कत्तलखाना नूतनीकरणासाठी पैसे दिले जात आहेत. वेद पाठशाळेचे निधी मंजूर करूनही पैसे दिले जात नाहीत, असं सांगतानाच सर्व भगात रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना भरपूर निधी दिला. या शहराशी आपले नाते आहे. या नात्यासाठी आम्ही आपला आदर करतो. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी 472 कोटी रुपये द्या, एकनाथ शिंदे साहेबांना सांगा, असं आवाहन चव्हाण यांनी केलं.

तुम्हीच लक्ष घातलं पाहिजे

डोंबिवलीवर प्रेम करा, कामे सुरू करा. कल्याणमधील नैसर्गिक प्रवाह बंद आहेत. नितीन गडकरी साहेबांना फोन करून सांगा. कल्याण शिळ रोडचे तुकडा तुकडा काम सुरू आहे. ही टीका नाहीये, ही व्यथा आहे. या सर्वांवर तुम्हीच लक्ष दिले पाहिजे. वेगळे विषय सांगता येऊ शकतात. आम्ही युतीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला नाही, असं चव्हाण म्हणाले.

आम्ही युतीचा धर्म पाळला

आम्ही युतीचा धर्म पाळला. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वैर नाही. विकास कामांसाठी आम्हला पैसे हवेत. 472 कोटी रुपये द्या. रस्ते डीपीआर तयार असेल तर मेट्रो, ग्रोथ सेंटर उभे राहिले पाहिजे. राजकारण म्हणून हे आम्ही मांडत नाही. हवं तर श्रेय तुम्ही घ्या. पण ही कामं करा. युतीतील कार्यकर्ता म्हणून तुम्ही आमची व्यथा जाणून घ्या, असं सांगातनाच आयुक्त चांगले काम करत आहेत. कोरोना काळात प्रत्येकाला कचरा कर लावू नका सांगितले, तरीही त्यांन कर लावला, असा टोला त्यांनी लगावला.

अशा कार्यक्रमात बोलणं योग्य नाही

यावेळी नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. डोंबिवलीकरांसाठी मोठा उपक्रम आहे. आपण लोकोपयोगी काम करतो तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवतो. एकाच भागासाठी 472 कोटीचा अट्टाहास न करता सर्व शहारासाठी उपयोग झाला पाहिजे. अडचणी असतील तेव्हा बोलू शकतो. पण चांगल्या कार्यक्रमात अशा प्रकारे बोलणं योग्य नाही, असा चिमटा शिंदे यांनी काढला.

मोदींच्या निर्देशानंतरच कर लागू केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशाप्रमाणे फडणवीस सरकारच्या काळात घनकचरा उपविधी कर लागू करण्यात आला. राजकरण करायचे तर सगळे करू शकतात. घोषणा तुमच्यापेक्षा दहा पटीने आम्ही देऊ. मात्र जे करतो ते लोकांसाठी, जनतेचा पैसे जनतेच्या कामासाठी वापरतो. लढाई करायची असेल तर कोव्हिड विरुद्ध केली पाहिजे. श्रेय वादाची लढाई शिवसेनेने केली नाही. एखाद्या विशिष्ट भागासाठी काम न करता सर्वसमावेशक असलं पाहिजे, असंही शिंदे म्हणाले. ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्या गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलो तर समस्या निर्माण होतील. गुन्हेगारांना कायद्याची भिती असली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

मानापमान नाट्य

डोंबिवलीतील लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही झाली. या कार्यक्रमाला भाजप आणि शिवसेनेचे कार्यक्रम उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्टेजवरील बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यामुळे चव्हाण स्टेजवर बसण्यास तयार नव्हते. उभे राहूनच हा कार्यक्रम पार पाडण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. माझ्याकडून काही चूक होणार नाही. तुमच्याकडून जे झाले आहे ते लक्षात ठेवा. आम्ही मराठा आहोत हिशोब इकडेच चुकता करणार, अशी शाब्दिक चमकमक यावेळी उडाली.

श्रीकांत शिंदेंची तत्परता

विविध विकास कामांचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा सुरू होण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण हे आपल्या असंख्य कार्याकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम स्थळी दाखल झाले. भाजप कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे सभागृहातील वातावरणच बदलून गेले. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करून भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला. (eknath shinde taunt ravindra chavan over development fund)

संबंधित बातम्या:

राज्यातील मंदिरे कधी उघडणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं पहिल्यांदाच मोठं विधान

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

‘बेकायदा बांधकामांचं काय तर अधिकृत बांधकामेचेही फूटामागे पैसे घेतले जातात’, मनसे आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

(eknath shinde taunt ravindra chavan over development fund)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.