Kalyan : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ

महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील माऊली सभागृहात एक दिवसीय मराठी साहित्य समिक्षा सम्मेलन आयोजन करण्यात आले होते. यावेळी सम्मेलनाचे अध्यक्ष मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Kalyan : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 7:26 PM

कल्याण : महाराष्ट्राचे राजकीय वातावरण जेव्हा बदलेल तेव्हा कदाचित या प्रश्नाची तड अनुकूल लागण्याचा संभव आहे. अमूक पक्षाचे सरकार असेल तर नाही, असं काही राजकारण त्यात आहे की काय अशी मला शंका येते, अशी प्रतिक्रिया मराठी (Marathi)ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबत ज्येष्ठ साहित्यकार सुधीर रसाळ (Sudhir Rasal) यांनी दिली आहे. तसेच नंदी दूध पितो याबाबत बोलताना यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धेचा भाग आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे या पातळीवर श्रद्धा ठेवणं असं असू शकत नाही. खरं म्हणजे आपले आधुनिकीकरण कधी होणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील माऊली सभागृहात एक दिवसीय मराठी साहित्य समिक्षा सम्मेलन आयोजन करण्यात आले होते. यावेळी सम्मेलनाचे अध्यक्ष मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Marathi should get the status of an elite language, Senior Literary Sudhir Rasal said)

नंदी दूध पितो याबाबत डॉ सुधीर रसाळ यांची प्रतिक्रिया

यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे अंधश्रद्धेचा भाग आहे. परमेश्वरांवर विश्वास ठेवणे म्हणजे या पातळीवर श्रद्धा ठेवणे असे असू शकत नाही. खरं म्हणजे आपले आधुनिकीकरण कधी होणार हा प्रश्न आहे. याचा निषेधच झाला पाहिजे. अशा बातम्या देणारे आणि असे काही तरी घडतंय असे सांगणारे यांना सामाजिक पातळीवर दोषी मानलं पाहिजे. समीक्षक म्हणून स्वतंत्र भूमिका असू शकत नाही. विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवणे. या सगळ्यामधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळतं. आधुनिकीकरण होणं आवश्यक आहे, मात्र दुर्दैवाने या दृष्टीने समाजात काहीही होताना दिसत नाही. आधुनिकीकरण तेव्हाच होईल जेव्हा विचारवंतांचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील. एकेकाळी हा होता, दुर्दैवाने आता अस्तित्वातच नाही. त्यामुळे अशा गोष्टी होतात. मुख्य आपला समाज आजही मध्ययुगी पातळीवर जगतोय हेच यातून स्पष्ट होतंय असं मला स्पष्ट वाटतं.

…तेव्हा कदाचित अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न निकाली लागेल

अभिजात भाषेचं असं आहे की तज्ज्ञांनी निर्णय घ्यायचा असतो, त्याबाबद्दल आपण अकारण राजकारण करतो. अभिजात भाषा कशी ठरवायची याबाबत निकष आहे. समिती आहे त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता. सादर केलेले पुरावे तपासून निर्णय घ्यायला पाहिजे होता. कोणत्याही प्रश्नांची योग्य प्रकारे सोडवणूक करत नाही ही दुर्दैवी बाब आहे. समितीचा निर्णय गोपनीय ठेवण्यात आला. महाराष्ट्राच राजकीय वातावरण बदलेल तेव्हा या प्रश्नाची तड अनुकूल लागण्याची शक्यता आहे असं मत व्यक्त केलं. (Marathi should get the status of an elite language, Senior Literary Sudhir Rasal said)

इतर बातम्या

ठाण्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या की महापौरांच्या आदेशावर चालते?; आनंद परांजपेंचा पालकमंत्र्यांना खोचक सवाल

मोदी पंतप्रधान नव्हे प्रचारक, युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी बेपत्ता, तरीही स्वतःची पाठ थोपटतात; पटोलेंची टीका

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.