उद्घाटनापूर्वीच नवीन कोपरी पुलाला तडे, ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी, मनसेकडून आंदोलन

नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याने पूल धोकादायक झाला असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शानस आणून दिली आहे.

उद्घाटनापूर्वीच नवीन कोपरी पुलाला तडे, ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी, मनसेकडून आंदोलन
MNS protest

ठाणे : नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याने पूल धोकादायक झाला असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शानस आणून दिली आहे. तसेच या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसेने आंदोलन सुरु केलं आहे. मनसेने आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि राज्य सरकारच्या विरोधात टाळ, मृदुंग आणि ढोलकी वाजवत आंदोलन केले. (New Kopari Bridge breached before inauguration, MNS demands action against contractors, officials)

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोपरी पूलाला तडे गेल्याने हा पूल धोकादायक झाल्याचे मनसेने निदर्शनात आणले होते. या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मनसेच्या वतीने मांडण्यात आली आले आहे. सदर ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन छेडले असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसात आणि मनसे पदाधिकारी यांच्यात बाचाबाचीदेखील झाली. दरम्यान, या पुलाबाबत कारवाई होत नाही तोवर पुलाचे उद्घाटन होऊ देणार नसल्याचे आंदोकांनी संगितले आहे. या आंदोलनावेळी 50 ते 60 मनसे पदाधिकाऱ्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरी वाहतूक कोंडीतून नागरिकांची, प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लेनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु यापैकी एका मार्गिकेवर तडे गेल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. (New Kopari Bridge breached before inauguration, MNS demands action against contractors, officials)

पैसे भरले तरच मृतदेह मिळेल, ठाण्यातील खासगी रुग्णालयाची मुजोरी

ठाण्यातील कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट खाजगी रुग्णालयात एका 32 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरु होते. या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित व्यक्तीचा मृतदेह नातेवाईंकडे सुपूर्द करण्यास मनाई केली. जोपर्यंत बिलचे पैसे भरले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात दिला जाणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतील. त्यानंतर मनसे नेते महेश कदम यांनी रुग्णालयाबाहेर झोपून निषेध केला. मनसेच्या या दणक्यामुळे अखेर रुग्णालयाने घाबरुन कोरोनाबाधित मृतदेह अत्यंविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

इतर बातम्या 

कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूचं गूढ उकललं, रिक्षाचालक पत्नीकडून दोन प्रियकरांच्या साथीने हत्या

मानलेल्या भाच्यासोबत संबंधाचा संशय, डोंबिवलीत काकाने अल्पवयीन पुतणीचा जीव घेतला

(New Kopari Bridge breached before inauguration, MNS demands action against contractors, officials)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI