KDMC School : कल्याणमध्ये मनपा शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

KDMC School : कल्याणमध्ये मनपा शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
कल्याणमध्ये मनपा शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शिक्षण उप आयुक्त अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव यांनी मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी करावयाची कार्यवाही याबाबत सूचना देण्यात आल्या.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 18, 2022 | 10:14 PM

कल्याण : कडोंमपा शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसह, शासनामार्फत आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षां (Competitive Exam)मध्ये प्राविण्य मिळण्यासाठी त्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळावे, ही बाब लक्षात घेऊन मनपा शाळांतील निवडक शिक्षकां (Teachers)साठी मार्गदर्शनपर शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. मा. स्थायी समिती सभागृह येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुधाकर पाटील, रविंद्र भोईर, जि.प. शिक्षक व नॉलेज अकॅडमी शहापूरचे केशव लोखंडे उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शिक्षण उप आयुक्त अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (Organizing training classes for Municipal School teachers in Kalyan)

सदर मार्गदर्शन शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी गणित, बुद्धिमत्ता, भाषा या विषयांसह शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करुन घ्यावी याचे सखोल मार्गदर्शन मनपा शाळांतील उपस्थित शिक्षकांना केले. महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, शिक्षण उप आयुक्त अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव यांनी मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी करावयाची कार्यवाही याबाबत सूचना देण्यात आल्या. या मार्गदर्शन शिबिरातून शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन प्राप्त झाल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ येत्या शैक्षणिक वर्षापासून मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी निश्चितच होईल. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार विस्तार अधिकारी विजय सरकटे यांनी मानले.

होळीनिमित्त एक पोळी अनाथांसाठी उपक्रम

होळी सण म्हणजे रंगांची उधळण आणि पुरण पोळीचा स्वाद ! या सणाचा आनंद घेत सामाजिक बांधिलकी जपत paws संस्थेने या वर्षी देखील पर्यावरण पूरक होळी आणि रंगपंचमी साजरी केली. पॉज संस्थेच्या साधना सभरवाल, ऋषिकेश सुरसे आणि संस्थापक निलेश भणगे यांनी अगदी अनोख्या पद्धतीने साजरी केली. होळीच्या दहनात पुरण पोळ्या अर्पण करण्याऐवजी त्या गरीब गरजू लोकांना वाटण्याची व्यवस्था केली. यात सुमारे 300 पुरणपोळ्या गोळा केल्या आणि त्या गरीब गरजूंना अनाथ आश्रमात वाटप केल्या. तसेच पुरणपोळी वाटून आनंद साजरा करा आणि लाकडे न तोडता, झाडांच्या फांद्या न छाटता, पाला पाचोळा गोळा करून त्याची होळी साजरी करा, असे लोकांना आवाहनही केले. (Organizing training classes for Municipal School teachers in Kalyan)

इतर बातम्या

Ulhasnagar Beating : फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kalyan Crime : कल्याणमध्ये जागेच्या वादातून बिल्डरच्या कार्यालयात तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें