AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात वर्षानंतर लैंगिक अत्याचाराला फुटली वाचा, पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेड्या

कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिसांनी 64 वर्षीय एका वयोवृद्धाला अटक केली आहे. या व्यक्तीवर आपल्या अल्पवयीन नातेवाईक मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना सात वर्षापूर्वीची आहे.

सात वर्षानंतर लैंगिक अत्याचाराला फुटली वाचा, पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेड्या
सात वर्षानंतर लैंगिक अत्याचाराला फुटली वाचा
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 5:45 PM
Share

कल्याण : अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील वृद्ध व्यक्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये सात वर्षानंतर उघडकीस आली आहे. सात वर्षे ही मुलगी मानसिक दबावा खाली होती. मात्र अखेरीस सात वर्षानंतर तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी माहिती दिली आहे. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्या 64 वर्षीय नातेवाईकाला बेड्या ठोकल्या आहेत. पिडीत मुलीचे वय आत्ता 14 वर्षे आहे. ती सात वर्षापासून इतक्या मानसिक तणावाखाली होती. ती कोणासोबत ही याबाबत बोलत नव्हती. मात्र आत्ता तिने सगळी हकीगत सांगितल्याने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. (Seven years later, sexual harassment broke out in kalyan, accuse arrest)

काय आहे नेमके प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिसांनी 64 वर्षीय एका वयोवृद्धाला अटक केली आहे. या व्यक्तीवर आपल्या अल्पवयीन नातेवाईक मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना सात वर्षापूर्वीची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी सात वर्षांपूर्वी तिच्या कुटुंबियांसोबत तिच्या नातेवाईकाच्या घरी काही दिवसांकरीता राहण्यास गेली होती. 2014 साली ही मुलगी नातेवाईकाच्या घरी होती. तेव्हा आरोपी नातेवाईकाने त्या मुलीवर काही वेळा लैगिंक अत्याचार केला होता. ही गोष्ट अन्य कोणाला सांगितल्यास तुझा लहाण बहिणीसोबत लैगिंक अत्याचार करणार अशी धमकी त्या मुलीला त्याने दिली होती. सात वर्षापासून पिडीत मुलगी प्रचंड मानसिक दबावाखाली होती.

घडल्या प्रकारानंतर पीडित मुलगी कुणाशीही नीट बोलत नव्हती, सतत विचारात मग्न रहायची. एके दिवशी तिच्या मोठ्या बहिणीने तिला विश्वासात घेत खूप प्रयत्न केले असता मुलीने आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. त्यानंतर तात्काळ या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. बाजारपेठ पोलिसांनी 64 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती कांदळकर या करीत आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. सात वर्षानंतर या प्रकरणास वाचा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचा बलात्कार

गेली काही वर्ष आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर 28 जणांच्या साथीने बलात्कार करणाऱ्या पित्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील एका 17 वर्षीय मुलीने समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्यांसह तिच्या वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या दोन दिवसानंतर तिच्या आईने आता आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Seven years later, sexual harassment broke out in kalyan, accuse arrest)

इतर बातम्या

धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

नवरात्रासाठी मंदिरात बसलेली महिला अचानक ऊसाच्या शेतात गेली, दोन दिवसांनंतरही बेपत्ता

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.