शहापुरात धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला

मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (10 जुलै) घटना घडली होती.

शहापुरात धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 6:52 AM

ठाणे : शहापुरातील जांभे धरणावर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला आहे. मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (10 जुलै) घटना घडली होती. या घटनेतील तरुणाचा मृतदेह अखेर 24 तासानंतर मिळाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Shahapur Jambhe Dam young man drowned deadbody found after 24 hours)

नेमकं काय घडलं? 

शहापूर तालुक्यातील जांभे धरणात मुलुंडमधील एका 32 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा तरुण 10 जुलैला त्याच्या सहा मित्रांसोबत फिरण्यासाठी गेला होता. हे सर्व मित्र जांभे धरणात पोहण्यासाठी उतरले. त्यातील एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मृतदेहाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण धरण परिसरात शोधमोहिम

या दुर्घटनेनंतर त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण धरण परिसरात शोधमोहिम राबवण्यात आली. पण शनिवारी अंधारामुळे या शोधमोहिमेस अडथळा निर्माण झाला. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा धरण परिसरात ही शोध मोहिम राबवण्यात आली. जवळपास गेल्या 24 तासांपासून किन्हवली पोलीस, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांकडून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरु होता.

24 तासांनतर मृतदेह सापडला

अखेर 24 तासांनतर रविवारी 11 जुलैला संध्याकाळी 5 च्या दरम्यान त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यानंतर शहापूरमधील शिवसह्याद्री रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेनंतर जांभे धरणावर फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटनास बंदी असतानाही पर्यटक मौजमजेसाठी धरणावर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले, धरणे, तलाव ओसांडून वाहू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक पर्यटक पर्यटन क्षेत्रावर फिरण्यासाठी गर्दी करतात. अनेक ठिकाणी पिकनिकला जाण्यास बंदी असतानाही पर्यटक फिरायला जातात. त्यामुळे या दुर्घटना घडत असल्याचे बोललं जात आहे.

(Shahapur Jambhe Dam young man drowned deadbody found after 24 hours)

संबंधित बातम्या : 

मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी धरणावर, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु

मित्रांसोबत धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह पाण्याबाहेर

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....